Pahalgam Terrorist Attack नंतर अडकलेल्या पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत सुखरूप दाखल

51
Pahalgam Terrorist Attack नंतर अडकलेल्या पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत सुखरूप दाखल
Pahalgam Terrorist Attack नंतर अडकलेल्या पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत सुखरूप दाखल

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची पहिली तुकडी आज पहाटे ३:३० वाजता सुखरूप मुंबईत पोहोचली. स्टार एअरलाइन्सच्या VTGSI या विशेष विमानाने हे पर्यटक टर्मिनल १ येथे उतरले. विमानतळावरून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आणि आनंदाचा भाव दिसत होता. (Pahalgam Terrorist Attack)

या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, त्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी शिंदे यांनी तत्काळ पावले उचलली. मंगळवारी रात्रीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पथक श्रीनगरला रवाना झाले होते. (Pahalgam Terrorist Attack)

शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार मुरजी पटेल, युवा सेनेचे सरचिटणीस राहूल कनाल आणि शेकडो शिवसैनिकांनी पहाटे विमानतळावर उपस्थित राहून या पर्यटकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. पर्यटकांनी सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेना आणि महायुती सरकारने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता आणि आभार व्यक्त केले. (Pahalgam Terrorist Attack)

हेही वाचा-Pahalgam Terrorist Attack : “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” ; Amit Shah यांचा इशारा

शिंदे यांनी स्वतः श्रीनगरला भेट देऊन मदतकार्याला गती दिली होती. केंद्र सरकारनेही विशेष विमाने तैनात करून या कार्यात सहभाग घेतला. (Pahalgam Terrorist Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.