Ashish Ubale : प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांची नागपुरात आत्महत्या ; व्हॉट्सअॅपवर लिहिली नोट

Ashish Ubale : प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांची नागपुरात आत्महत्या ; व्हॉट्सअॅपवर लिहिली नोट

256
Ashish Ubale : प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांची नागपुरात आत्महत्या ; व्हॉट्सअॅपवर लिहिली नोट
Ashish Ubale : प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांची नागपुरात आत्महत्या ; व्हॉट्सअॅपवर लिहिली नोट

प्रसिद्ध मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे (Ashish Ubale) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या रामकृष्ण मठातील एका गेस्ट रूममध्ये त्यांनी आपले आयुष्य संपवले. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने आयुष्य संपवत असल्याचा मेसेज त्यांनी स्वतःला पाठवला आणि त्यानंतर हा टोकाचा निर्णय घेतला. (Ashish Ubale)

हेही वाचा-India-Bangladesh Trade : युनूस सरकारला भारताचा मोठा झटका ! बांगलादेशमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर लादले ‘बंदर निर्बंध’ 

दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी अग्नी, एका श्वासावे अंतर, किमयागार अशा मालिकांची निर्मिती केली आहे. तसेच गार्गी, प्रेमासाठी वाटेल ते, बाबुरावला पकडा या चित्रपटांचीही निर्मिती त्यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे आशिष उबाळे यांचा ‘गार्गी’ नावाचा चित्रपट 2009 साली नागपूर येथे भरलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता. (Ashish Ubale)

हेही वाचा- Solapur Fire : अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये भीषण आग, तीन कामगारांचा मृत्यू

दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी नागपूरच्या रामकृष्ण मठातील एका गेस्ट रूममध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोजा असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तशा आशयाचा मेसेज उबाळे यांनी स्वतःला व्हॉट्सॲप वर पाठविल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. (Ashish Ubale)

हेही वाचा- Israel-Hamas Conflict : आयडीएफच्या कारवाईत २४ तासांत १४६ पॅलेस्टिनी ठार; इस्त्रायलची मोठ्या कारवाईच्या दिशेने वाटचाल

नागपूरच्या रामकृष्ण मठामध्ये त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे हा सेवेकरी म्हणून काम करत होता त्याला भेटण्यासाठीच आशिष उबाळे आले होते. ते गेस्टरुममध्ये मुक्कामी होते. त्यांनी मठामध्ये जेवण केले आणि दुपारी आराम करण्यासाठी असे सांगून रुममध्ये गेले. सायंकाळी त्यांचा भाऊ सारंग त्याला उठवण्यासाठी गेला असता त्यांनी रूमचा दरवाजा उघडला नाही, त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. (Ashish Ubale)

हेही वाचा- ‘Operation Sindoor’ दरम्यान भारताच्या रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या वापराने जग अवाक्, नेमकं काय घडलं जाणून घ्या

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आशिष उबाळे यांनी स्वतःला व्हाट्सअपवर स्वतःला एक नोट पाठवली आहे ज्यामध्ये कर्जामध्ये असल्याने आयुष्य संपवल्याचे म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. (Ashish Ubale)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.