Excise Scam Delhi : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ

Excise Scam Delhi : सिसोदिया यांना यापूर्वी 26 फेब्रुवारी 2023 रोजी सी.बी.आय.ने अटक केली होती. या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामिनावर बाहेर आहेत.

98
Excise Scam Delhi : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ
Excise Scam Delhi : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाही, न्यायालयीन कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या न्यायालयीन कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 30 मे रोजी त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर सिसोदिया यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. (Excise Scam Delhi)

15 मे रोजी न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती. ईडीने 9 मार्च 2023 रोजी या प्रकरणात चौकशी केल्यानंतर मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांना यापूर्वी 26 फेब्रुवारी 2023 रोजी सी.बी.आय.ने अटक केली होती. या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामिनावर बाहेर आहेत. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. केजरीवाल यांनी राऊज एव्हेन्यू न्यायालयात नियमित जामीन याचिका दाखल केली आहे.

(हेही वाचा – बीडमध्ये Jitendra Awhad यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन)

पदाचा गैरवापर

21 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) सी.बी.आय. आणि ई.डी. प्रकरणांमध्ये सिसोदिया यांचा दुसरा जामीन अर्ज फेटाळला होता. सिसोदिया यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. खटल्याला विलंब झाला आहे, या आधारावरच सिसोदिया यांची याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, फिर्यादी पक्षाने खटला चालवण्यास उशीर केला नाही आणि आरोपींच्या वतीने अनेक याचिका दाखल करण्यात आल्या, ज्यामुळे विलंब झाला. (Excise Scam Delhi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.