काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा; PM Narendra Modi यांची टीका 

137

कर्नाटकातील काँग्रेस राजवटीत एका दुकानदाराला हनुमान चालीसा लावल्यामुळे मारहाण करण्यात आली. काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा आहे. काँग्रेसची विचारसरणी नेहमीच तुष्टीकरणाची राहिली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान मोदी एका निवडणुकीच्या जाहीर सभेत बोलत होते. कर्नाटकातील बंगळुरू येथे हनुमान चालिसा लावल्यामुळे एका दुकानदाराला काही मुसलमान तरुणांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेची पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी सभेत उल्लेख करून काँग्रेसवर टीका केली.

(हेही वाचा MNS : मनसेचा महायुतीच्या ‘या’ उमेदवारांना विरोध; प्रचार करण्यास नकार)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

2004 मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच त्यांनी आंध्र प्रदेशातील एससी/एसटीचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना देण्याचे काम केले. 2011 मध्ये काँग्रेसने संपूर्ण देशात याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने व्होट बँकेच्या राजकारणासाठी एससी/एसटी आणि ओबीसींना दिलेले हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. परवा मी देशासमोर सत्य मांडले होते की, काँग्रेस तुमची संपत्ती हिसकावून आपल्या खास लोकांना वाटण्याचा कट रचत आहे. काँग्रेसचे व्होट बँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण मी उघड केले. काँग्रेसने सत्तेत असताना दलित आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाशी छेडछाड केली. बाबासाहेबांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना दिलेला आरक्षणाचा अधिकार काँग्रेसला धर्माच्या आधारावर मुस्लिमांना द्यायचा होता. मी तुम्हाला गॅरंटी देतो की, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण संपणार नाही आणि धर्माच्या नावावर फूट पडू देणार नाही, असेही मोदी (PM Narendra Modi) यावेळी म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.