वर्धापन दिनाआधीच उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यंगचित्रातून डागली शिवसेना उबाठावर ‘राजकीय तोफ’

59
वर्धापन दिनाआधीच उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यंगचित्रातून डागली शिवसेना उबाठावर 'राजकीय तोफ'
  • प्रतिनिधी

शिवसेनेचा वर्धापन दिन अजून उजाडायचा आहे, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने शिवसेना उबाठावर आधीच व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. “हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी” असा मजकूर असलेले एक तीव्र राजकीय संदेश देणारे व्यंगचित्र शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसिद्ध करण्यात आले असून, वर्धापन दिनाआधीच राजकीय वातावरण तापले आहे.

वाघाच्या साथीला शिंदे – भगवा झेंडा खांद्यावर!

या व्यंगचित्रात शिवसेनेचा पारंपरिक वाघ एका दमदार नेत्यासोबत चालताना दाखवण्यात आला आहे, ज्याच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे आणि मागे महाराष्ट्र उभा आहे. तो नेता म्हणजे अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde). या रचनेद्वारे “अस्सल शिवसेना आमचीच”, असा अप्रत्यक्ष दावा शिवसेनेने केल्याचे स्पष्ट दिसते.

(हेही वाचा – Gaza-Palestine Support Protest साठी अनुमती नाकारली; हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !)

शिवसेना उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

हे व्यंगचित्र केवळ कलात्मक नसून त्यामागे स्पष्ट राजकीय धार आहे. विधानसभेतील विजयाचे दाखले देत शिवसेनेने संदेश दिला आहे की, “जनता आमच्या पाठीशी आहे, कारण आम्ही हिंदुत्वाशी प्रामाणिक आहोत.” यातून शिवसेना उबाठाने हिंदुत्वाचा मार्ग सोडल्याचा आरोप पुन्हा अधोरेखित करण्यात आला आहे.

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यंगचित्राचा ‘संकल्प’

गुरुवार, १९ जून रोजी वरळीतल्या एनएससीआय डोममध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. या मेळाव्याला पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या वेळी महापालिका निवडणुकांमधील रणनिती, स्थानिक नेतृत्व आणि आगामी दृष्टीकोन यावर भाष्य करतील, अशी शक्यता आहे.

(हेही वाचा – BMC : बेवारस आणि भंगारवजा वाहने रस्त्यावरुन हटवून त्यांची विल्हेवाट लावण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश)

ठाकरे शैलीत उत्तर, पण शिवसेनेकडून ‘स्मार्ट स्ट्राइक’

पारंपरिक ‘ठाकरे शैली’ म्हणजेच व्यंगचित्रांमधून विरोधकांवर टीका करण्याची परंपरा उद्धव ठाकरे यांच्यापासून सुरू आहे. पण यंदा तीच शस्त्र वापरत शिवसेनेनेच पलटवार केला आहे, हे विशेष. या व्यंगचित्रातून शिवसेनेने आगामी निवडणुकांच्या रणभूमीत आपली बाजू स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. “वाघ आमच्याबरोबर, भगवा खांद्यावर, आणि महाराष्ट्र पाठीशी” – असा आत्मविश्वास या चित्रातून दिसतोय. वर्धापन दिनाच्या आधीच रंगत गेलेला हा व्यंगचित्र युद्ध आता राजकीय चर्चा आणि सोशल मीडियावर गाजू लागला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.