जगातील आघाडीचे उद्योगपती इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क (Errol Musk) यांनी बुधवारी दुपारी अयोध्येतील श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. हा अनुभव अद्भुत आणि सर्वोत्तम होता, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हनुमानगढी मंदिरात पूजा-अर्चना केली. आपली मुलगी अलेक्झांड्रा मस्क हिच्यासमवेत इरॉल मस्क दुपारी अडीच वाजता अयोध्या विमानतळावर पोहोचले आणि चार वाजता परतले. श्रीराम मंदिरातील दर्शनाच्या वेळी त्यांनी कुर्ता-पायजमा परिधान केलेला होता. शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. (Errol Musk)
VIDEO | After visiting temples in Ayodhya, Errol Musk (@errol_musk ) shared his experience, saying, “My experience was wonderful. It is one of the best things I’ve ever done. I’m glad that I visited here, and I can’t wait to see the temple get completed.”
(Full video available… pic.twitter.com/CBUeRES98H
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2025
एरॉल मस्क (Errol Musk) म्हणाले, “मला खूप आनंद आहे की मी आज अयोध्येत आलो आहे. मी या मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याची वाट बघू शकत नव्हतो. भारत हे एक अद्भूत ठिकाण आहे. ज्यांना-ज्यांना शक्य होईल त्यांनी भारतात आलं पाहिजे. माझ्या देशातही हजारो भारतीय लोक राहतात. मला भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्यावं असं वाटतं. येथील लोक खूप प्रेमळ व दयाळू आहेत. मी इथे आतापर्यंत जितक्या लोकांना भेटलोय ती सगळीच चांगली माणसं होती. मला वाटतंय की भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी चांगले होतील.” असं ते यावेळी म्हणाले. (Errol Musk)
Errol Musk:
“India is a beautiful country. People must visit India. Indian culture is good. People are decent and full of love.”Yet, some choose to live in India while supporting Pakistan’s agenda.
A reminder that true respect comes from standing with India, not against it. pic.twitter.com/8pHegqTZZh
— Ravi Kumar Yadav 🇮🇳 (Modi ji Ka Parivar) (@Raviyadav_bjp) June 4, 2025
एरॉल मस्क (Errol Musk) १ जून रोजी भारतात दाखल झाले होते. ते ६ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दिल्लीत दाखल झाल्यावर ते म्हणाले होते की “मी राम मंदिर पाहण्यासाठी खूपच उत्सूक आहे. भारताचा इतिहास अविश्वसनीय आहे. मला असं वाटतं की जगाचा इतिहास कोणत्या ना कोणत्या मार्गे भारताशी जोडलेला आहे. वेद १४ हजार वर्षे जुने असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ते त्याही आधीचे आहेत. वेदांमध्ये उडणाऱ्या विमानांचा उल्लेख आहे. हे सगळं खूप आकर्षक व अविश्वसनीय असं आहे.” (Errol Musk)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community