West Bengal : राहुल गांधींना मृत्यूचा ‘खेला’ मान्य का?; बंगालमधील निवडणुकीतील हिंसाचारावर स्मृती इराणींचा सवाल

109

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आणि त्यांना विचारले की अशा घटना त्यांना मान्य आहेत का?

पश्चिम बंगालमध्ये त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान राज्याच्या ग्रामीण भागात हिंसाचार आणि जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाला. या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात चुरशीची लढत झाल्याचे बोलले जात आहे. तर, बंगालमधील हिंसाचारावर राहुल गांधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, पश्‍चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांमध्ये लोकशाहीचा घातपात होताना लोक पाहत आहेत, जिथे लोकशाही हक्क बजावण्यासाठी लोकांची हत्या केली जात आहे. काँग्रेस त्याच तृणमूलशी हातमिळवणी करत आहे, जे पश्चिम बंगालमध्ये कहर करत आहेत त्यांच्याशी हातमिळवणी करणे मान्य आहे का? मृत्यूचा हा खेला राहुल गांधी मान्य आहे का?

(हेही वाचा Dilip Walse Patil : मला ईडी, सीबीआयची कुठलीही नोटीस आली नाही; वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडण्यामागील सांगितले कारण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.