राज्यात तब्बल पाच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) मार्ग मोकळा झाला असून, वर्षाअखेरीस ही निवडणूकप्रक्रिया पार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली असून, त्यानंतर आरक्षण आणि मतदार यादी अद्ययावत करण्याच्या टप्प्यांतून निवडणुकांकडे वाटचाल सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दिलासा, निवडणुकीचे ढग हटले
६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी (OBC) आरक्षणाच्या अडथळ्यानंतर निवडणुकांना मार्ग मोकळा करत निवडणूक आयोगाला कार्यवाहीसाठी चार आठवड्यांचा अवधी दिला. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, “प्रभाग रचना – ७० दिवस, आरक्षण प्रक्रिया – १५ दिवस, आणि मतदार यादी अपडेट – ४० दिवस असा अंदाजे कालावधी आहे. त्यामुळे निवडणुका डिसेंबर २०२५ पर्यंत होण्याची शक्यता आहे.”
(हेही वाचा – IPL 2025, Digvesh Rathi : दिग्वेश राठीवर एका सामन्याचं निलंबन, मैदानावरील आक्रमकपणा नडला)
कशामुळे लांबल्या निवडणुका?
“ओबीसी आरक्षण, न्यायालयीन याचिका, प्रभाग रचना व सदस्यसंख्येच्या तांत्रिक बाबी यामुळे निवडणुकीचा (Election) वेळ पुढे ढकलला गेला,” असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात प्रशासकांच्या आधीन असलेल्या संस्था
- २७ महानगरपालिकांचा कार्यकाळ २०२० ते २०२३ दरम्यान संपला आहे.
- एकूण २९ महानगरपालिका, २४८ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती, ३२ जिल्हा परिषद, आणि ३३६ पंचायत समित्यांमध्ये सध्या प्रशासकांची नियुक्ती आहे.
- इचलकरंजी आणि जालना या नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिका देखील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुका २२७ जागांवर
बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतही स्पष्टता आली असून, यंदा ही निवडणूक पूर्वीच्या २३६ नव्हे तर सध्याच्या २२७ जागांसाठीच घेतली जाईल.
ओबीसी (OBC) आरक्षणासाठी २७ टक्क्यांची शिफारस बांठिया आयोगाने केली होती आणि ५० टक्के आरक्षण मर्यादेत हे शक्य असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.
(हेही वाचा – National Herald Case : “गांधी कुटुंबाने आर्थिक गैरव्यवहारातून १४२ कोटी कमविले”; ईडीचा न्यायालयात मोठा दावा)
राजकीय समीकरण तापणार!
राज्यातील स्थानिक निवडणुका म्हणजे पक्षांची खऱ्या अर्थाने ताकद तपासण्याची परीक्षा.
महायुती (भाजपा, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट, आणि काँग्रेस) यांच्यात चुरशीची लढत होणार हे निश्चित आहे.
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, महायुती एकत्र लढणार, परंतु काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता.
- काँग्रेसने स्थानिक स्तरावर उमेदवारी ठरवण्याचा अधिकार दिला आहे.
- उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी रणनीतीबाबत चर्चा सुरू केली आहे.
- जयंत पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युनिटला निवडणुकीच्या तयारीचे आदेश दिले आहेत.
राज्यभरात २०२५ च्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतपेट्यांचे आवाज घुमणार, राजकीय समिकरणांची फेररचना होणार आणि नवीन नेतृत्व पुढे येणार – महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाण्याची शक्यता!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community