Local Elections : महापालिका निवडणुका तीन टप्प्यांत; ‘मुंबई….’, लवकरच कार्यक्रम जाहीर होणार

राज्यात 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदांसाठी रणधुमाळी सुरू होणार

53
Local Elections : महापालिका निवडणुका तीन टप्प्यांत; 'मुंबई....', लवकरच कार्यक्रम जाहीर होणार
  • प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) रणधुमाळी लवकरच रंगणार असून, ऑक्टोबरमध्ये राज्य निवडणूक आयोग निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिका व स्थानिक संस्थांच्या निवडणुका यंदा तीन टप्प्यांत पार पडणार असल्याचे संकेत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. (Local Elections)

पहिला टप्पा उत्तर-दक्षिण महाराष्ट्रात, अंतिम टप्पा मुंबईत

राज्य निवडणूक आयोगाने आखलेल्या प्राथमिक आराखड्यानुसार :
  • पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रातील महानगरपालिका व स्थानिक संस्थांमध्ये मतदान होणार.
  • दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव रंगणार.
  • तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कोकणातील महापालिकांमध्ये निवडणूक होणार असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – India Tour of England : इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय खेळाडूंचा पहिला सराव, काय काय घडलं?)

कोणत्या संस्थांसाठी होणार निवडणुका?

यंदा होणाऱ्या निवडणुकांमध्ये (Election) राज्यातील २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २८८ पंचायत समित्यांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित होत्या, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ऑक्टोबरमध्ये या प्रशासकांना निरोप देत लोकशाही प्रक्रियेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. (Local Elections)

प्रभाग रचना महत्त्वाची अडचण, काहींचा न्यायालयीन मार्ग

निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले की, २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्रभाग रचना केली जाणार आहे. काही शहरांमध्ये प्रभागांची सीमारेषा व संख्या बदलली जाणार आहे. या बदलांविरोधात काही राजकीय पक्ष वा नागरिक न्यायालयात धाव घेऊ शकतात, त्यामुळे प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण निवडणूक (Election) प्रक्रिया तीन ते साडेतीन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. (Local Elections)

(हेही वाचा – “कोट्यवधींचा घोटाळा? जलसंपदा खात्यातील इंजिनिअर्सच्या बढत्या-बदल्यांना CM Devendra Fadnavis यांच्याकडून ‘ब्रेक’)

राजकीय पक्ष सज्ज, मैदानात उतरायला उत्सुक

निवडणूक (Election) वेळापत्रकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना, शिवसेना उबाठा, मनसे अशा प्रमुख पक्षांनी आपल्या पक्ष संघटना आणि प्रचारयंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. (Local Elections)

लोकशाहीचा उत्सव पुन्हा एकदा रंगणार!

राज्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांकडे (Election) नागरिक, पक्ष कार्यकर्ते, तसेच राजकीय निरीक्षकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ऑक्टोबरमध्ये शंखनाद होणार, आणि संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा मतदार रंगभूमीवर अवतरणार हे निश्चित झाले आहे. (Local Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.