गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळेंच्या खांद्यावर मुंबईची धुरा; …असा आहे शिंदे गटाचा मास्टर प्लॅन

96

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याची मोहीम हाती घेतली असून, खासदार गजानन कीर्तिकर आणि राहुल शेवाळे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

( हेही वाचा : गुजरातची बोट रत्नागिरीच्या समुद्रात बुडाली; दोन खलाशांचा मृत्यू)

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, मुख्यनेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महानगरपालिका क्षेत्राची संघटनात्माक कार्याची जबाबदारी सहा पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यात खासदार तथा शिवसेना नेते गजानन किर्तीकर, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार व उपनेते राहुल शेवाळे, उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, उपनेत्या आशा मामिडी, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे यांचा समावेश आहे.

उद्धवसेनेला मोठे खिंडार पडणार?

  • आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करून मतदारांना सामोरे जाण्याची योजना उद्धव ठाकरे यांनी आखली असताना, एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत (कवाडे गट) युती करून उद्धवसेनेला शह दिला आहे.
  • दुसरीकडे कीर्तिकर यांच्यासारख्या जाणत्या शिवसैनिकाकडे मुंबईची संघटनात्मक धुरा देऊन एकनाथ शिंदे यांनी पालिका निवडणुकीची दिशा आखून दिली आहे.
  • त्याचप्रमाणे १३ खासदारांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या राहुल शेवाळे यांच्यावरही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • एकंदरीत, गेल्या काही दिवसांत शिंदे गटात घडत असलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यास लवकरच मोठ्या संख्येने नगरसेवक फुटून उद्धवसेनेला मोठे खिंडार पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

New Project 3 2

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.