DCM Eknath Shinde : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत देदीप्यमान, स्वाभिमान आणि शौर्याचं प्रतीक राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री Eknath Shinde म्हणाले. प्रसिध्द शिल्पकार राम सुतार यांना पुतळा निर्मितीकरिता फोन करून जलदगतीने नवा पुतळा उभारण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, रेकॉर्डब्रेक वेळेत छत्रपती शिवरायांचा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी सांगितले.
(हेही वाचा पुढील १०० वर्षांपर्यंत शिवरायांचा पुतळा दिमाखात उभा राहणार; Devendra Fadnavis यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण )
ते पुढे म्हणाले, राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा आहे. हातात २९ फुटांची तलवार आहे आणि समोर राजकोट किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला आहे. शिवरायांच्या हातात २९ फुटी समशेर असून आता खऱ्या अर्थाने इकडून(समुद्राकडून) इकडे बघण्याची हिंमत होणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी भारत-पाक तणावावर भाष्य केले आहे. यावेळेस पंतप्रधान मोदी पूजनास उपस्थिती राहू शकले नाहीत. पण, ते तिकडे देशाचं रक्षण करतायत हेदेखील शिवकार्यचं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला शिवरायांचा पुतळा पाहिल्यानंतर प्रेरणा आणि उर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. राज्यातल्या शिवभक्तांचं स्वाभिमान आणि शौर्याचं प्रतीक याठिकाणी उभारण्यात आले आहे. तसेच, शिवरायांच्या पुतळा उभारणीत शिल्पकार राम सुतार यांचं मोठ योगदान असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नातून पुतळा उभारणीचं काम सुरू झाल्याचा उल्लेख शिंदेंनी यावेळी केला.Eknath Shinde
Join Our WhatsApp Community