शिवसेना कुणाची ठरवण्यासाठी लवकर निर्णय घ्या! शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

86

शिवसेना नक्की कुणाची हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या गटानेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच शिंदे गटानेही याच मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. आता शिवसेना नक्की कुणाची यावर अंतिम निर्णय घ्यावा, याकरता निवडणूक अयोगाला प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी शिंदे गटाने न्यायालयाकडे केली आहे. त्यासाठी याचिका दाखल केली आहे.

पोट निवडणुकीसाठी धावपळ 

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे. सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असा न्यायालयाचा आदेश आहे, मात्र न्यायालयाच्या  निर्णयाआधीच शिवसेना पक्षाविषयीचा निर्णय लागणे महत्त्वाचे असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. येत्या काही काळात राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक होणार आहे. तसेच मुंबईतल्या अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जागेसाठीची पोटनिवडणूकही घेतली जाणार आहे. यावेळी उमेदवार उभे करण्यासाठी तसेच त्यांच्या चिन्हाविषयीचा वाद मिटवण्यासाठी आयोगाचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनवाणीला स्थगिती देऊ नये, यासाठी एकनाथ शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. आगामी काही निवडणुकांच्या आदी शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि इतर तांत्रिक बाबींचा निकाल लागणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाने तत्काळ सुनावणी घ्यावी. निवडणूक आयोगाची सुनावणी सुरु ठेवण्याबाबत स्पष्टता करावी, अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मधल्या काळात एक दिलासादायक बाब घडली.

(हेही वाचा ‘वर्षा’वरील स्नेहभोजनाला शिंदे गटातील ‘हा’ आमदार राहणार गैरहजर, चर्चांना उधाण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.