Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

नुकतेच शिवसेनेचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी ते विटा येथे गेले होते.

353
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या डोळ्याची ठाण्यातील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. शुक्रवारी सकाळी मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांच्या (Chief Minister Eknath Shinde) डोळ्यांची शस्त्रक्रिया केली.

ही लेझर शस्त्रक्रिया असल्याने डॉक्टरांनी त्यांना १ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सातत्याने सुरू असलेले विविध ठिकाणचे दौरे, दिवसभरातील व्यस्त कार्यक्रम यामुळे मुख्यमंत्री राज्यभरात फिरतीवर असतात.

(हेही वाचा – Gyanwapi Case : ज्ञानवापी संकुलात पूजा होणारच; मुसलमान पक्षाला न्यायालयाकडून दिलासा नाही)

नुकतेच शिवसेनेचे खानापूरचे आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी ते विटा येथे गेले होते. त्यानंतर शुक्रवारी ते ठाण्यात आले. त्यानंतर ठाण्यातील वावीवर आय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. या लेझर शस्त्रक्रियेनंतर काही काळ डॉक्टरांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.