विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. मागील अनेक दिवसांत अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील ठाकरेंच्या 10 नगरसेवकांनी मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंचे (Eknath Shinde) नेतृत्व स्वीकारले आहे. यामुळे नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. (Eknath Shinde)
📍#ठाणे |#नवी_मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सौ.सुनीता रतन मांडवे यांनी आज ठाण्यातील आनंदआश्रम येथे #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासह बेलापूर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे, शाखाप्रमुख अनुभव… pic.twitter.com/EWCvLkdrEG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 1, 2025
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नवी मुंबईमधील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाच्या 55 नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंदाश्रमात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. (Eknath Shinde)
हेही वाचा-Central Railway QR Code Service : मेल, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “तुम्ही खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तुमचे सर्वांते मनापासून स्वागत करतो. नवी मुंबईतील एकूण 55 नगरसेवक दाखल झाले आहेत. या सर्वांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. या सर्वांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे. पक्षात दररोज होणारे पक्षप्रवेश शिवसेनेला अधिक बळकटी मिळवून देत आहेत. विधानसभा निवडणुकीने खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न कायमचा निकाली काढल्याने आता पक्षात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.” (Eknath Shinde)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community