मलिकांविरोधात ‘या’ प्रकरणी 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल

87

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांच्या विरोधात तब्ब्ल पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या बॉक्समध्ये ही कागदपत्रे भरून कोर्टात आणली. मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकांना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायलयीन कोठडीत आहे.

ईडीच्या वकिलांनी काय सांगितले?

न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये तब्बल ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, मनी लाँड्रिरिंग प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणासाठी विशेष न्यायालय कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आरोपपत्राची दखल घेण्यात येईल असे वकिलांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – मनसेचं ठरलं; ३ मे रोजी ‘भोंगा’ लागणारच)

समन्स बजावल्यानंतरही ईडी समोर हजर नाही

नवाब मलिकवर दाऊद इब्राहिमचे सहकारी हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मुंबई कुर्ला येथील मुनिरा प्लंबरची वडिलोपार्जित मालमत्ता हडप करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात मलिकविरुद्ध तपास सुरू आहे. मलिक यांचे कुटुंबीय तपासात सहकार्य करत नसल्याने ईडीने म्हटले आहे. ईडीने विशेष न्यायालयाला असे सांगितले की, मलिकांची मुले अनेक समन्स बजावल्यानंतर चौकशीसाठी ईडी समोर हजर झाले नाहीत. मलिकांविरोधात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र एकूण ५ हजार पानांचे असून ९ खंड आणि ५२ परिशिष्ट आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.