Eat Right India : माहिम चौपाटीवर देशातील पहिलं ‘सर्व महिलांनी चालवलेलं’ ईट राईट स्ट्रीट फूड हब सुरु ; महाराष्ट्राचा स्तुत्य उपक्रम

Eat Right India : माहिम चौपाटीवर देशातील पहिलं 'सर्व महिलांनी चालवलेलं' ईट राईट स्ट्रीट फूड हब सुरु – महाराष्ट्राचा स्तुत्य उपक्रम

67
Eat Right India : माहिम चौपाटीवर देशातील पहिलं 'सर्व महिलांनी चालवलेलं' ईट राईट स्ट्रीट फूड हब सुरु – महाराष्ट्राचा स्तुत्य उपक्रम
Eat Right India : माहिम चौपाटीवर देशातील पहिलं 'सर्व महिलांनी चालवलेलं' ईट राईट स्ट्रीट फूड हब सुरु – महाराष्ट्राचा स्तुत्य उपक्रम

महिलांच्या सशक्तीकरणाची आणि अन्नसुरक्षेची दिशा एकवटणारा एक अनोखा उपक्रम (Eat Right India) मुंबईत सुरू झाला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माहिम रेतीबंदर येथे ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’ प्रकल्पांतर्गत ‘माहिम सीफूड प्लाझा’ हा भारतातील पहिला संपूर्ण महिलांनी चालवलेला स्ट्रीट फूड हब म्हणून घोषित करण्यात आला आहे. (Eat Right India)

हेही वाचा-MegaBlock : रविवारी ‘या’ मार्गावरचा ब्लॉक रद्द ; काय आहे कारण घ्या जाणून …

या प्रकल्पात सहभागी झालेल्या १५३ महिलांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेविषयीचे FSSAI सर्टिफिकेट देण्यात आले. हे प्रमाणपत्र राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्व महिला स्वयं-सहायता गटांशी संलग्न असून, त्या या हबचे संपूर्ण व्यवस्थापन सांभाळत आहेत. (Eat Right India)

प्रशिक्षणादरम्यान महिलांना स्वच्छता, अन्न साठवण, सुरक्षित कुकिंग प्रॅक्टिसेस आणि दर्जेदार कच्चा माल निवड यासारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे स्ट्रीट फूडची प्रतिमा बदलून ते आता सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी बनणार आहे. (Eat Right India)

हेही वाचा- Ladki Bahin Yojana साठी सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागांचा 745 कोटींचा निधी वर्ग

मंत्री योगेश कदम म्हणाले, “महिला सक्षम असतील तर अन्नसुरक्षेचं कार्यही प्रभावीपणे होऊ शकतं. माहिम सीफूड प्लाझा हा त्याचा उत्कृष्ट आदर्श आहे.” FDA आयुक्त राजेश नार्वेकर (IAS) आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या संकल्पनेतून आणि सहायक आयुक्त अनुपमा पाटील यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साकार झाला आहे. (Eat Right India)

कार्यक्रमात BMC व FDA च्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती दक्षिता पवार, अनिकेत पाटरे, अजिंक्य पच्छारकर यांचा समावेश होता. (Eat Right India)

हेही वाचा- Made in India iPhone : अमेरिकेत वापरले जाणारे ५० टक्के आयफोन भारतात बनलेले – टीम कूक

हा उपक्रम केवळ महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नाही, तर तो आरोग्यविषयक जनजागृतीचा एक प्रभावी माध्यम ठरतोय. महाराष्ट्र सरकारकडून अन्नविक्री व्यवस्थेतील हा एक सकारात्मक आणि अनुकरणीय बदल मानला जात आहे. (Eat Right India)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.