ऑपरेशन सिंदूरवर सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल कोलकाता पोलिसांनी २२ वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनौली (Sharmishta Panoli) हिला गुरुग्राम येथून अटक केली. या प्रकरणात, डच खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी आता शर्मिष्ठाचे समर्थन केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शर्मिष्ठाच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
Free the brave Sharmishta Panoli!
It’s a disgrace for the freedom of speech that she was arrested.
Don’t punish her for speaking the truth about Pakistan and Muhammad.
Help her @narendramodi! @AmyMek #Sharmishta#IStandwithSharmishta #ReleaseSharmistha #FreeSharmishta pic.twitter.com/YhGSLhuyr2
— Geert Wilders (@geertwilderspvv) May 31, 2025
वाइल्डर्स यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “शर्मिष्ठाला (Sharmishta Panoli) अटक करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कलंक आहे. पाकिस्तान आणि मोहमंदबद्दल सत्य बोलल्याबद्दल तिला शिक्षा होऊ नये. वाइल्डर्स यांनी त्यांच्या पोस्टरमध्ये ‘ऑल आईज ऑन शर्मिष्ठा’, असे आवाहन केले आहे.
(हेही वाचा स्वातंत्र्यानंतर शिकवल्या जाणाऱ्या खोट्या इतिहासाचा बुरखा टराटरा फाडणारा चित्रपट ‘His Story of itihas’)
२०२२ मध्ये वाइल्डर्स यांनी भाजपाच्या नुपूर शर्मा यांनाही पाठिंबा दिला होता. त्यांनी काश्मीरमधील रियासी येथे हिंदूंवरील हल्ल्याविरुद्धही भूमिका घेतली होती. शर्मिष्ठा हिने एका व्हिडिओमध्ये ऑपरेशन सिंदूरवर बॉलिवूड स्टार्सच्या मौनावर टीका केली होती, ज्यामध्ये आक्षेपार्ह टिप्पण्या होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने माफी मागितली आणि तो काढून टाकला, परंतु कोलकातामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. यादरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांनी तिला बलात्कार आणि ‘सर तन से जुदा’ अशी धमकी दिली, परंतु कोलकाता पोलिसांनी इस्लामिक कट्टरपंथीयांऐवजी शर्मिष्ठाला (Sharmishta Panoli) अटक केली.
Join Our WhatsApp Community