डॉ. दाभोलकर (Dr. Dabholkar) मेले याचे मला खूप दुःख झाले, दुःख याच्यासाठी झाले नाही की त्यांचा मृत्यू झाला. रोज माणसे मरतच असतात, पण आम्ही दाभोलकरांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पुरावे जमा करत होतो, दाभोलकर (Dr. Dabholkar) मेले नसते तर कदाचित आम्ही त्यांना जेलमध्ये पाठवले असते. जेलमध्ये जायच्या आधीच ते मेले. म्हणूनच कदाचित त्यांचा दुसरा गांधी होईल, या गोष्टीचे वाईट वाटते. दाभोलकरांच्या (Dr. Dabholkar) घोटाळ्यांवर सरकार काही कारवाई करत नाही, पण त्यांच्या हत्येविषयी हिंदुत्वनिष्ठांना शिक्षा देऊन मोकळे झाले, अशा शब्दांत हिंदू विधिज्ञ परिषदेचे सरचिटणीस अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी हल्लाबोल केला.
सातारा येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, या पुस्तकाचे लेखक विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला ३००हून अधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.
विक्रम भावे यांच्या पायात सुख लोळण घेत होते, चार पिढ्या बसून खातील इतका पैसा आहे, तरीही त्यांनी ते सगळे सोडून हिंदू धर्मासाठी कार्य करायला जीवन समर्पित केले. प्रचंड त्रास झाला, जेलमध्ये जावे लागले, तरीही त्यांनी हिंदुत्वाचे कार्य नेटाने चालू ठेवले, असेही अधिवक्ता इचलकरंजीकर म्हणाले. दाभोलकर (Dr. Dabholkar) प्रकरणात पुण्यातील ब्राह्मण समाजातील आणि बहुजन समाजातील हिंदुत्वनिष्ठ तरुणांना अटक करून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला, तो प्रयत्न अधिवक्ता पुनाळेकर यांनी हाणून पाडला म्हणून त्यांनाच अटक झाली. पोलीस आझाद मैदान दंगलीत, नागपूर दंगलीत मार खातात, अकोल्यात त्यांची पोलीस ठाणे जाळली जातात, पण ते पोलीस कधी कुठल्या दर्गा किंवा मशिदीतील बैठकांमध्ये बसत नाही, पण या अशा कार्यक्रमात येऊन बसतात. त्यांना हिंदु आतंकवादी वाटत आहेत, असे सांगत सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दंगल झाली. तेथील बरेचशा हिंदुत्वनिष्ठांना त्रास झाला. याचे शल्य मनात आहे. हिंदूंनो, तुम्ही जर संघटितपणे लढणार असाल, तर आम्ही तुमच्यासमवेत आहोत. सरकार काही करेल या भरवशावर बसू नका, असेही अधिवक्ता इचलकरंजीकर म्हणाले.
हिंदुत्वासाठी तडजोड करणार्यांशी कोणतेही संबंध ठेवू नका ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर
जेव्हा सत्तेला धक्के बसतात, तेव्हा प्रस्थापितांना त्रास होतो. महाराष्ट्रातील साखर, शिक्षण आणि सहकार सम्राटांनी बारामतीमधील हजारो कोटी रुपयांचे प्लॉट कवडीमोल भावाने सरकारकडून मिळवले आहेत; मात्र हिंदु विधीज्ञ परिषदेमुळे आज या सर्व जागांच्या बाहेर ही जागा शासनाकडून घेतल्याचे फलक लावावे लागले आहेत. आम्ही प्रामाणिकपणे हिंदुत्वासाठी लढत आहोत. त्यामुळे आम्हाला त्रास झाला; मात्र मालेगाव बॉंबस्फोटातील मुसलमानांच्या बाजूने लढलेले अधिवक्ता हे खासदार झाले. मला साहाय्यक म्हणून विक्रम भावे काम करत होते. त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले. आतंकवाद्यांच्या बाजूने लढणार्या अधिवक्त्यांना कधीही त्रास होत नाही; मात्र हिंदुत्वाच्या बाजूने लढणार्या अधिवक्तांना त्रास होतो. ईश्वर आमच्या पाठीशी आहे, शेवटी आमचाच विजय नक्की आहे. हिंदुत्वासाठी तडजोड करणार्यांशी कोणतेही संबंध ठेवू नका, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी यावेळी केले. (Dr. Dabholkar)
हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कुणावरही विसंबून राहू नका – विक्रम भावे
‘माझ्या अटकेपासून ते सुटकेपर्यंत मी अनेक अनुभव घेतले आहेत. या अनुभवांचे हे पुस्तक आहे. माझी वाचकांना विनंती आहे की, या पुस्तकाकडे ‘विक्रम भावे’, यांचे व्यक्तीगत अनुभव म्हणून पाहू नका, तर एका हिंदुत्वनिष्ठाचे प्रातिनिधिक अनुभव म्हणून पहा; कारण आम्ही ‘जात्यात’ होतो, त्या वेळी अजून कुणीतरी ‘सुपात’ असणारे आहेत. ते सुपातील जात्यात येतील, तेव्हा सुपात एक दिवस काहीच शिल्लक रहाणार नाही. ‘या देशात हिंदुत्वनिष्ठ असणे म्हणजे अपराध आहे कि काय ?’, असे वाटण्यासारखे असे माझे हे अनुभव आहेत. माझी वाचकांना विनंती आहे की, हे पुस्तक वाचून अवश्य जागृती करावी. हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी कुणावरही विसंबून राहून चालणार नाही, तर आपल्यालाच कष्ट घ्यावे लागणार आहेत, असे लेखक विक्रम भावे म्हणाले.
विक्रम भावेंचे पुस्तक भयाण वास्तव – सुनील घनवट
विक्रम भावे यांचे हे पुस्तक एखादी कादंबरी किंवा कथा नसून एका भयाण वास्तवाचे वस्तूनिष्ठ दर्शन आहे. भावे हे वर्ष २००८ पासून वर्ष २०२२ पर्यंत किती विपरित आणि अन्यायकारक स्थितीला सामोरे गेले, याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.) असो, सीबीआय असो किंवा पुणे येथील विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी) असो, सर्व अन्वेषण यंत्रणांतील काही दुष्ट अधिकार्यांनी निरपराध भावे यांना नाहक या प्रकरणात गुंतवून प्रचंड मनस्ताप आणि शारीरिक यातना दिल्या आहेत. हा इतिहास केवळ विक्रम भावे यांचा नसून ते ‘हिंदु आतंकवाद’ नावाच्या एका बागुलबुवाच्या बळी पडलेल्या निरपराध तरुणांचे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे. सनातन संस्थेच्या एक-दोन नव्हे, तर १० हजारो निरपराध साधकांना चौकशांना सामोरे जावे लागले. अनेक महिलांना रात्री-अपरात्री चौकशीला बोलावण्यात आले. या कालावधीत मानवाधिकारांचे कशा प्रकारे हनन झाले, याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट म्हणाले.
Join Our WhatsApp Community