ॲपलला भारतात उत्पादन करण्यासाठी जायचे असेल तर जावे. मात्र, तसे केले, तर कंपनीला टॅरिफ दिल्याशिवाय विक्री अमेरिकेत करता येणार नसल्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिला आहे. ॲपलनंतर ट्रम्प यांनी आता सॅमसंगलासुद्धा इशारा दिला आहे. जर अमेरिकेत निर्मिती केली तर कोणताही टॅरिफ लागू होणार नाही. पण बाहेरून तयार केलेले फोन विकणार असाल तर २५ टक्के टॅक्स द्यावा लागेल. असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. (Donald Trump)
हेही वाचा-नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार ; Chandrashekhar Bawankule यांच विधान
व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, “हे टॅरिफ शुल्क फक्त ॲपलपर्यंत मर्यादीत नाहीत. सॅमसंग ही कंपनीसुद्धा अमेरिकेत फोन विकते. त्यांच्यावरही हे सगळं लागू आहे. जर अमेरिकेत निर्मिती केली तर कोणताही टॅरिफ लागू होणार नाही. पण बाहेरून तयार केलेले फोन विकणार असाल तर २५ टक्के टॅक्स द्यावा लागेल.” असं ट्रम्प यांनी म्हणलं आहे. (Donald Trump)
हेही वाचा- Delhi Heavy rain : दिल्लीत जोरदार पाऊस ! विमानांच्या 100 फेऱ्या रद्द , अनेक भागांत पाणी साचले
ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटका ॲपलला बसला आहे. ॲपलचे २.६ टक्के शेअर्स घसरले असून यामुळे कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला आहे. ॲपल सध्या त्यांच्या आयफोन निर्मितीसाठी चीनऐवजी भारताला प्राधान्य देत आहे. अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन हे भारतात तयार झालेले असतील. अमेरिका-चीन यांच्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर ॲपलने हा निर्णय घेतला होता. (Donald Trump)
सॅमसंगने २०१९ मध्येच चीनमधून फोन निर्मिती करणं बंद केलं होतं. सध्या सॅमसंग भारत, दक्षिण कोरिया. व्हिएतनाम आणि ब्राझीलमध्ये स्मार्टफोन तयार करते. सॅमसंग चीनवर अवलंबून नाहीय. पण ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतच फोन तयार करणाऱ्या कंपन्यांना टॅरिफमधून सूट मिळणार असल्यानं कंपनीला नुकसान होऊ शकतं. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community