भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई केल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आला. पाकने भारताला कारवाई थांबवण्यासाठी संपर्क साधला तर दुसरीकडे अमेरिकच्या (Donald Trump) हातपाया पडला. त्यानंतर दोन्ही देशांनी काल संध्याकाळी 5 वाजता सीजफायर, युद्धविरामाची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाची घोषणा करतानाच काश्मीर प्रश्नावर महत्त्वाचे भाष्य केले. (Donald Trump)
दोन्ही देशांशी चर्चा करुन …
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पोस्ट लिहिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्र विराम झाला आहे. दोन्ही देशांनी ही बाब समजून घेतली याचं मला समाधान आहे. आता काश्मीर प्रश्नावरही तोडगा काढू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यशी माझी या विषयावर फारशी चर्चा झालेली नाही. मात्र दोन्ही देशांसह व्यापार विस्तार करण्याची अमेरिकेची भूमिका आहे. मी दोन्ही देशांशी चर्चा करुन आम्ही काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. देवाच्या प्रयत्नाने हा प्रश्न सुटेल असं वाटतं आहे, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. (Donald Trump)
I am very proud of the strong and unwaveringly powerful leadership of India and Pakistan for having the strength, wisdom, and fortitude to fully know and understand that it was time to stop the current aggression that could have lead to to the death and destruction of so many,…
— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) May 11, 2025
काश्मीर प्रश्नावर २०१९ मध्ये काय घडलं ?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान २०१९ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले होते. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करु असं म्हटलं होतं. मात्र भारताने याबाबत नकार दिला होता. तसंच ट्रम्प यांचा प्रस्ताव स्वीकारला नव्हता. दरम्यान आता पुन्हा एकदा डोनाल्ड्र ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करु असं म्हटलं आहे. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community