व्हाइट हाऊसमध्ये Donald Trump दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींसोबत भिडले ; Video Viral

व्हाइट हाऊसमध्ये Donald Trump दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींसोबत भिडले ; Video Viral

86
व्हाइट हाऊसमध्ये Donald Trump दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींसोबत भिडले ; Video Viral
व्हाइट हाऊसमध्ये Donald Trump दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींसोबत भिडले ; Video Viral

व्हाइट हाऊसमध्ये माध्यमांसमोर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात जोरदार वादविवाद झाला. दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या शेतकऱ्यांची कत्तल होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी पुरावा म्हणून एक व्हिडिओ दाखवला आणि दावा केला की दक्षिण आफ्रिकेत गोरे लोक मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहेत. यामुळे शेतकरी अमेरिकेकडे धावत आहेत. रामाफोसा यांनी यावर कारवाई करावी. अशी मागणी ट्रम्प यांनी केली. (Donald Trump)

रामाफोसा यांनी हे दावे फेटाळून लावले आणि म्हटले की, नरसंहाराचे आरोप खोटे आहेत. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील सर्व वंशांचे लोक हिंसक गुन्ह्यांमुळे त्रस्त आहेत. त्यापैकी बहुतेक कृष्णवर्णीय आहेत. तिथे फक्त गोऱ्या लोकांचाच छळ होत नाहीये. आमचे सरकार दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. असे रामाफोसा यांनी सांगितले. (Donald Trump)

दोन्ही नेत्यांमध्ये संभाषण सुरळीत चालू होते. अचानक ट्रम्प यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना व्हिडिओ प्ले करण्यासाठी लाइट बंद करण्यास सांगितले. यामुळे रामाफोसा यांना धक्का बसला. व्हिडिओ सुरू झाल्यावर रामाफोसा यांनी ट्रम्प यांना हातवारे करून विचारले, हे काय आहे? तथापि, ट्रम्प यांनी त्यांना वाट पाहण्यास सांगितले. रामाफोसा यांनी मागे वळून पाहिले आणि व्हिडिओ दोन-तीन वेळा पाहिला. ट्रम्प यांनी व्हिडिओला गोऱ्या लोकांच्या नरसंहाराचा पुरावा म्हटले आणि म्हटले की त्यात हजारो गोऱ्या शेतकऱ्यांच्या कबरी दिसत आहेत. (Donald Trump)

रामाफोसा यांनी संयम राखला आणि दाव्यांचे खंडन केले. ते म्हणाले, “मी हा व्हिडिओ यापूर्वी कधीही पाहिला नाही. हा व्हिडिओ कुठला आहे ते आम्ही शोधू. आम्ही त्याची सत्यता सविस्तरपणे तपासू. आमच्या देशात गुन्हेगारी आहे आणि त्याचा परिणाम प्रत्येकावर होतो. मग ते काळे असोत किंवा गोरे. ” रामाफोसांच्या आश्वासनानंतरही ट्रम्प थांबले नाहीत. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत मारल्या गेलेल्या गोऱ्या लोकांबद्दलच्या बातम्यांच्या छापील प्रती दाखवल्या. पाने उलटत असताना, ट्रम्प मोठ्याने खून…खून म्हणत राहिले. (Donald Trump)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.