अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर थेट 104% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. ही तीव्र आर्थिक कारवाई मंगळवारी 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. (Donald Trump)
काय घडलं ?
अमेरिकेने चीनवर १०४ टक्के कर लादल्याच्या निर्णयाची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. दरम्यान, अमेरिकेने आधी चीनवर ३४ टक्के आयात शुल्क लावलं होतं. मात्र, अमेरिकेने चीनवर लादलेल्या या ३४ टक्के आयात शुल्कानंतर चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर ३४ टक्के आयात शुल्क लावण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला होता की चीनने ८ एप्रिलपर्यंत ३४ टक्के कर मागे घेतला नाही तर अमेरिका ५० टक्के अतिरिक्त कर लादेल. (Donald Trump)
हेही वाचा-एफएसआय कपात न करण्याचा सरकारचा निर्णय; Pravin Darekar यांच्या पाठपुराव्याला यश
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीपुढे चीनने झुकण्यास नकार दिला. तसेच जशास तसे उत्तर देण्याची भूमिका चीनने घेतली होती. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का देत चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर १०४ टक्के इतका मोठा कर लादण्याची घोषणा केली आहे. (Donald Trump)
अमेरिकेच्या या इशाऱ्याला चीननेही प्रत्युत्तर दिलं होतं. “टॅरिफ ब्लॅकमेल”ला चीन घाबरणार नाही”, असं चीनने म्हटलं होतं. “चीनविरुद्ध शुल्क वाढवण्याची अमेरिकेची धमकी ही एक चूक आहे. यामुळे अमेरिकेची ब्लॅकमेलिंगची सवय पुन्हा एकदा स्पष्ट होतेय, जर अमेरिकेने आयात शुल्क मागे घेतले नाहीत तर चीन शेवटपर्यंत लढेल,” असे चीनच्या मंत्रालयाने म्हटलं होतं. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community