कुत्र्याने न खाल्लेले बिस्कीट दिले कार्यकर्त्याला; Rahul Gandhi झाले ट्रोल

1272

सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. ही यात्रा झारखंडमध्ये आली होती, तेव्हा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. यात राहुल गांधी कुत्र्याला बिस्कीट देत आहेत, ते बिस्कीट कुत्र्याने खाल्ले नाही तेव्हा ते बिस्कीट त्यांनी चक्क कार्यकर्त्याला खायला दिले. यावर नेटकऱ्यांनी त्यांना खूप ट्रोल केले.

(हेही वाचा Govind Dev Giri Maharaj : ज्ञानवापी आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत गोविंददेव गिरी महाराज यांचे मुसलमानांना आवाहन, म्हणाले…)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मागील वर्षी भारत जोडो यात्रा काढली होती, त्यावेळी त्यांनी चुकीची विधाने केली, त्यामुळे त्यांची यात्रा वादात सापडली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे. आता त्यामध्येही ते वादात सापडत आहेत. या यात्रेत असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) हे त्याच्या जवळ असलेल्या कुत्र्याला बिस्कीट खाऊ घालत होते, पण त्या कुत्र्याने बिस्कीटे खाल्ली नाही. ती बिस्किटे तिथेच जमली होती, त्याच वेळी एक कार्यकर्ता राहुल गांधी यांना भेटायला आला असता त्यांच्याशी बोलता बोलता राहुल गांधी यांनी कुत्र्याने न खाल्लेली सगळी बिस्किटे एकत्र करून ती त्या कार्यकर्त्याला दिली. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. त्यावर राहुल गांधी ट्रोल होत आहेत.

काही नेटकरी म्हणाले की, ही जुनी परंपरा आहे, त्यांनी याआधीच्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांप्रमाणे कृती केली आहे.

तर पेलरम देवासी म्हणाले, तो कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत होता आणि कुत्र्याने त्याचा वास घेऊन बिस्कीट खाल्ले नाही. कदाचित म्हणूनच काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणत असतील की, जो जोरात भुंकेल त्याला पक्षाचा बूथ कार्यकर्ता बनवा.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.