शिवसेना उबाठावर असंतोषाचा विस्फोट, कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा BJP मध्ये जाहीर प्रवेश; रविंद्र चव्हाण अध्यक्षपदी

174
शिवसेना उबाठावर असंतोषाचा विस्फोट, कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा BJP मध्ये जाहीर प्रवेश; रविंद्र चव्हाण अध्यक्षपदी
  • प्रतिनिधी 

शिवसेना उबाठा प्रणित कामगार संघटनेच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या शेकडो सदस्यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला. भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा भव्य पक्षप्रवेश सोहळा मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला. याच कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

इंडिगो, स्पाइसजेट, बीडब्ल्यूएफएस, एअर इंडिया यांसारख्या मोठ्या कंपन्यांतील कर्मचारी संघटनांचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते. “शिवसेना उबाठाकडून सातत्याने अन्याय होत असल्याने आणि कर्मचारी भरडले जात असल्याची भावना निर्माण झाल्याने आम्ही भाजपात (BJP) प्रवेश करत आहोत”, असे सदस्यांनी स्पष्टपणे नमूद केले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रविंद्र चव्हाण यांनी अध्यक्षपद स्वीकारताना सांगितले की, “कामगार हितासाठी मी जीव तोडून काम करीन. मोदी सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट असेल.”

(हेही वाचा – Cabinet Decision : एकाच क्लिकवर वाचा राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय)

त्यांनी भाजपाची (BJP) विचारधारा कामगारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवेल यावर विश्वास व्यक्त केला. “सर्व कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष जितेंद्र राऊत व सरचिटणीस सुहास माटे यांनी सांगितले की, “गेल्या दीड वर्षांपासून दोन राजकीय पक्षांच्या संघर्षात कामगार भरडले गेले. मात्र चव्हाण यांच्याच नेतृत्वात कामगारांना न्याय मिळू शकतो, याची खात्री असल्याने आम्ही त्यांना अध्यक्षपद दिले.”

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये योगेश आवळे, निशांत गायकवाड, विनोद घोगले, प्रशांत वर्तक, हर्षित तासकर, दिनेश शेवाळे, करण कांबळे, धनंजय कांबळे, युवराज ढोरे, अक्षय काळभोर, अजित आचरेकर, सतीश बांदल, सुधीर पवार, महेश मोरे आदींचा समावेश होता. या निर्णायक घडामोडींमुळे कामगार संघटनेचे राजकीय समीकरण पूर्णतः बदलल्याचे चित्र आहे. आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.