गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Devendra Fadnavis and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis and Raj Thackeray) कोणतीही प्रतिक्रिया न देता हॉटेलबाहेर पडले. (Devendra Fadnavis and Raj Thackeray)
हेही वाचा-देशात Corona बाधित रूग्णांचा आकडा 7154 वर ; 77 जणांचा मृत्यू
आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि अन्य विरोधी पक्ष देखील कामाला लागले आहेत. एकीकडे महायुती ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी करत आहे. तसेच मुंबईचा गड काबीज करण्यासाठी भाजपही जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. (Devendra Fadnavis and Raj Thackeray)
हेही वाचा- Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत राजकीय प्रवास !
या भेटीनंतर उदय सामंत आणि संदीप देशपांडे यांची भेट झाली. यावेळी प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली याची कल्पना मला नाही. मी एक प्रस्ताव घेऊन उदय सामंत यांच्या भेटीला आलो होतो. पनवेलमध्ये फुलबाजार सुरु करायचा आहे. त्यासाठी मी उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी युतीची चर्चा वगैरे काही झाली नाही. युतीची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर होते. कार्यकर्ते युतीची चर्चा करत नाहीत. (Devendra Fadnavis and Raj Thackeray)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community