Dinesh Bobhate : उबाठाचे खासदार अनिल देसाईंचे सचिव दिनेश बोभाटे अडचणीत; ईडीने बजावले समन्स

416
Dinesh Bobhate : उबाठाचे खासदार अनिल देसाईंचे सचिव दिनेश बोभाटे अडचणीत; ईडीने बजावले समन्स
Dinesh Bobhate : उबाठाचे खासदार अनिल देसाईंचे सचिव दिनेश बोभाटे अडचणीत; ईडीने बजावले समन्स

उबाठा गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्या विरोधात ईडीने समन्स बजावले आहे. या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिळकतीपेक्षा 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप दिनेश बोभाटे (Dinesh Bobhate) यांच्यावर आहे. या प्रकरणी ईडीने दिनेश बोभाटे यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तोंडावर अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा आयपीएलमध्ये अनोख विक्रम )

36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवली

17 जानेवारीला सीबीआयने दिनेश बोभाटे यांच्या विरोधात मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. बोभाटे यांच्यावर 2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनेश बोभाटे 2013 ते 2023 दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होते. यादरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. सीबीआयने या प्रकरणी दिनेश बोभाटे आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोभाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

उबाठाचे नेते यंत्रणांच्या रडारवर

ऐन निवडणुकांच्या तोंडावर उबाठा गटाचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, आमदार राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब यांच्यासह आणखी काही जणांचा समावेश आहे. आता दिनेश बोभाटे (Dinesh Bobhate) यांच्या चौकशीमुळे खासदार अनिल देसाईही रडारवर आले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.