Devendra Fadnavis : राम मंदिर आंदोलनाचा जुना फोटो टि्वट करत देवेंद्र फडवणीस यांनी दिले विरोधकांना चोख उत्तर

गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या श्रेयवादावरून ठाकरे गट आणि भाजप यांच्यात वाद सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद पडली त्यावेळी भाजपवाले बिळात लपले होते का अशी टीका केली होती.

279
Devendra Fadnavis : राहुल गांधी, ठाकरेंकडून महिला शक्तीचा वारंवार अवमान

प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी (Ayodhya Shri Ram Mandir) सजली आहे. उद्या (सोमवार २२ जानेवारी) होणाऱ्या सोहळ्यासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. अशातच शनिवार २० जानेवारी या अनुष्ठानाच्या पाचव्या दिवशी पहाटे शर्कराधिवास, फलाधिवास हे विधी करण्यात संपन्न झाले. त्यानंतर संध्याकाळी पुष्पाधिवास विधी पार पडला. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Manoj Jarange : ‘२६ जानेवारीपर्यंत तोडगा काढा’; जरांगेंचा सरकारला इशारा)

मात्र गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या श्रेयवादावरून ठाकरे गट आणि भाजप (Devendra Fadnavis) यांच्यात वाद सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाबरी मशीद पडली त्यावेळी भाजपवाले बिळात लपले होते का अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण कारसेवेला हजर होतो पण तेव्हा शिवसेनेचे लोक कुठे दिसले नाहीत, अशी टीका केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीस यांच्या वजनानेच बाबरीचा ढाचा पडल्याचे खोचक उत्तर दिले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला आहे. राम मंदिर आंदोलनातील या फोटोत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिसत आहेत.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : आपला लाडका ‘लालबागचा राजा’ जाणार रामललाच्या भेटीला)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपला एक जुना फोटो ट्विट करून ‘जुनी आठवण…’ असं कॅप्शन दिलं आहे. पुढे ते म्हणाले की; “नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (२२ जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे…नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.” (Devendra Fadnavis)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.