राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मागील ३ वर्षांहून अधिक काळ रखडेल्या महापालिका निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे महायुती सरकार स्वागत करते. तसेच, आम्ही राज्य निवडणूक आयोगाला तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा चौंडीतील विशेष Cabinet Meeting ऐतिहासिक निर्णय : अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव, ग्रामीण विकासाला गती )
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना पूर्ण आरक्षण लागू असणार आहे. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं महायुती सरकार अतिशय मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढेल. जर एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेले ३ वर्षांहून अधिक रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका निवडणुकीसंदर्भात अधिसूचना पुढील ४ आठवड्यांत निघाली पाहिजे. यानंतर चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले.(Devendra Fadnavis)
Join Our WhatsApp Community