Devendra Fadanvis – Sharad Pawar समोरासमोर; सहकारावरून राजकीय जुगलबंदीला चढणार रंग

69

राज्यातील सहकार चळवळीवरून नेहमीच परस्पर विरोधी भूमिका घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज सोमवारी एका व्यासपीठावर येणार आहेत. राज्य सहकारी बँकेच्या (State Cooperative Bank) वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित ‘सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण’ या परिसंवादात दोन्ही नेत्यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. सहकार क्षेत्रातील धोरणांवरून गेल्या काही काळात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. त्यामुळे या व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी कोणती भूमिका मांडणार याकडे राज्याचे राजकारण डोळे लावून आहे.

सहकार क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यांपासून ते सहकारी संस्थांच्या आर्थिक संकटांपर्यंत अनेक मुद्दे यावेळी चर्चेत येण्याची शक्यता आहे. विशेषतः शरद पवार यांनी सहकार क्षेत्राचे जुने योगदान आणि फडणवीस सरकारच्या धोरणांवर टीका करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे फडणवीस यांनी सहकार क्षेत्रातील पारदर्शकता आणि नव्या सुधारणांची बाजू मांडण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे.

या एकाच व्यासपीठावरून दोन्ही नेत्यांनी सहकार क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात कोणते संकेत देतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळातील नजर लागली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.