Dev Priya: तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा डंका; भारतीय तरुणाची अमेरिकेने घेतली दखल!

बिहारच्या मुलाने चमत्कार केला आहे. 'द मार्क्विस हू'ज हू' प्रकाशन मंडळाने देवप्रियाला 50 सर्वोत्तम तंत्रज्ञांपैकी एक म्हणून गौरविले आहे. त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केले जे कोरोनाच्या काळात खूप उपयोगी ठरले.

116
Dev Priya: तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा डंका; भारतीय तरुणाची अमेरिकेने घेतली दखल!
Dev Priya: तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा डंका; भारतीय तरुणाची अमेरिकेने घेतली दखल!

भारत कृषीप्रधान देश (Agricultural Country) असूनही भारताने विविध क्षेत्रांत काम करुन जगात आपली वेगळीच छाप पाडत आहे. त्यामुळेच भारताच्या एका खेडेगावातील तरुणाने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने सातासमुद्रापार भारताचं नाव मोठं केलं आहे. संबंधित तरुण हा बिहार जिल्ह्यातील (Bihar District) पाटणा येथील असून, तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. (Dev Priya)

पाटणा येथे खेडेगावातील देव प्रिया (Dev Priya) या तरुणांची तंत्रज्ञान क्षेत्रात जगासाठी दिलेल्या योगदानाची अमेरिकेच्या ‘द मार्किस हूज हू पब्लिकेशन बोर्ड’ (The Marquis Who’s Who Publication Board) ने दखल घेतली आहे. ज्यांना त्यांच्या तांत्रिक क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल 2024-2025 या वर्षात देशपातळीवरील 50 सर्वोत्कृष्ट तांत्रिक तज्ञांसह त्यांची निवड करून अमेरिकन भूमीवर ‘द मार्कीस हूज हू पब्लिकेशन बोर्ड’ ने सन्मानित केले आहे. (Dev Priya)

(हेही वाचा – Arvind Kejriwal: ईडीनंतर आता सीबीआयच्या रडारवर अरविंद केजरीवाल; अटक होणार?)

देवने बनवले ‘पर्पल’ सॉफ्टवेअर

देवप्रियने पर्पल ए1 नावाचे सॉफ्टवेअरचा (Purple A1 Software) शोध लावला होता, ज्याचा वापर करुन जनरेटिव्ह च्या आधारे अँटीव्हायरस तयार केले जाते. हे तंत्र अतिशय उपयुक्त मानले जात असून, हे सॉफ्टवेअर तयार केले जे कोरोनाच्या काळात खूप उपयोगी ठरले. ज्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते. तंत्रज्ञान क्षेत्रासाठी हे उपयुक्त ठरणार असल्याचे संस्थेने मानले आहे. या आधारावर संस्थकडून देवची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत घेण्यात आली होती. त्यानंतर निवड झाल्यावर देवला कुरिअरद्वारे उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. (Dev Priya)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.