Ajit Pawar : राष्ट्रवादीचा सर्वाधिक 10 वेळा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा विक्रम 

186
अजित पवार यांनी रविवारी पाचव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सर्वाधिक काळ राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावे आहे. यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ राहिले आहे. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ तीन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. आतापर्यंत राज्याला एकूण 15 उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
  • नाशिकराव तिरपुडे (काँग्रेस) – 5 मार्च 1978 ते 18 जुलै 1978 (मुख्यमंत्री – वसंतदादा पाटील)
  • सुंदरराव सोळंके (काँग्रेस) – 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 (मुख्यमंत्री – शरद पवार)
  • रामराव आदिक (काँग्रेस) – 2 फेब्रुवारी 1983 ते 5 मार्च 1985 (मुख्यमंत्री – वसंतदादा पाटील)
  • गोपीनाथ मुंडे (भाजप) – 14 मार्च 1995 ते 18 ऑक्टोबर 1999 (मुख्यमंत्री – मनोहर जोशी)
  • छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – 18 ऑक्टोबर 1999 ते 23 डिसेंबर 2003 (मुख्यमंत्री – विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे)
  • विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – 25 डिसेंबर 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 (मुख्यमंत्री – सुशीलकुमार शिंदे)
  • आर आर पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – 1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008 (मुख्यमंत्री – विलासराव देशमुख)
  • छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – 8 डिसेंबर 2008 ते 7 नोव्हेंबर 2009 (मुख्यमंत्री – अशोक चव्हाण)
  • छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – 7 नोव्हेंबर 2009 ते 11 नोव्हेंबर 2010 (मुख्यमंत्री – अशोक चव्हाण)
  • अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)- 11 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 (मुख्यमंत्री – पृथ्वीराज चव्हाण)
  • अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) – 7 डिसेंबर 2012 ते 28 सप्टेंबर 2014 (मुख्यमंत्री – पृथ्वीराज चव्हाण)
  • अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) – 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 (मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस)
  • अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) – 30 डिसेंबर 2019 ते 29 सप्टेंबर 2022 (मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे)
  • देवेंद्र फडणवीस (भाजप) – 30 जून 2022 ते विद्यमान (मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे)
  • अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2 जुलै 2023 पासून (मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.