राज्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सहपत्नीक बजावला मतदानाचा हक्क; आईचा हात पकडलेला फोटो होतोय व्हायरल

मतदानाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केलं आवाहन

191
राज्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सहपत्नीक बजावला मतदानाचा हक्क; आईचा हात पकडलेला फोटो होतोय व्हायरल

जगातील सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election 2024) मतदानाचा पहिल्या टप्पात मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील पाच मतदारसंघांत मतदान होत असून, नागपूर (Nagpur Lok Sabha Election 2024) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) हे वृद्ध आईचा हात पकडत सहपत्नीक मतदान केंद्रावर पोहोचले. मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला.  (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Narayan Rane : भव्य शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जनतेला आव्हान 

“मी माझ्या कुटुंबियांसोबत मतदान (Voting) केले, आपणही मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हा”, असे आवाहन या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ईशान्येकडील २५ जागांवर चुरशीची लढत !)

नागपूरमध्ये झाले एवढे टक्के मतदान

सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने चर्चेत आहेत. महायुतीच्या सभा, रॅली, नाराजी दूर करणे, रणनीती आखणं, उमेदवारी अर्ज दाखल करणे यात देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. दरम्यान, नागपूर येथे दुपारी १ वाजेपर्यंत २८.७५ टक्के मतदान झालं आहे. त्यात मध्य नागपूर – २८.४२ टक्के, पूर्व नागपूर – ३१.३० टक्के, उत्तर नागपूर – १९.४८ टक्के, दक्षिण नागपूर – ३१.८९ टक्के, दक्षिण-पश्चिम नागपूर – ३२ टक्के, पश्चिम नागपूर – ३०.०५ टक्के इतके मतदान झालं आहे. (Devendra Fadnavis)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.