रात्री उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण

157
रात्री उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण
रात्री उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा भेट घेतली. ही भेट जवळपास दोन ते अडीच तासांपेक्षा जास्त काळ चालली. फडणवीस रात्री अकरा सव्वा अकराच्या आसपास वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि रात्री उशिरा सव्वा वाजताच्या दरम्यान वर्षा निवासस्थानावरून निघाले.

मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बंड करून चाळीस आमदारांना घेऊन आपला वेगळा गट सत्तेमध्ये सामील केला आणि आपल्या पदरात मुख्यमंत्रीपद पाडून घेतले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अजित दादांनी काही आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले आहेत. या सर्व घटनाानंतर शिवसेना शिंदे गट त्याचप्रमाणे भाजपच्या मंत्री पदासाठी इच्छुक आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शुक्रवारी गरवारे क्लब मध्ये भाजपच्या आमदारांची देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या वरिष्ठांचा महाराष्ट्र बाबत काय अजेंडा आहे त्याबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली. या सर्वांनंतर भाजपच्या आमदारांवर याचा किती परिणाम झाला हे येणारा काळच सांगू शकेल. राष्ट्रवादीला सत्तेत सामील करून घेतल्यानंतर असाच नाराजीचा सूर हा शिवसेने मधून देखील येत होता त्याला शमवण्याचा आटोकाट प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील करण्यात आला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होईल अशा बाबी सांगून नाराजांची मनधरणी करत आहेत.

(हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांनी पाठवली शिवसेनेसह ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस)

फक्त मंत्रिमंडळ नाही तर महामंडळाचे देखील वाटप होणार…

मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. हीच बाब दोन्ही गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.