Deonar Dumping Ground वरून राजकारण तापले; गिधाडांचे आरोप आणि कचऱ्यातून बाहेर पडलेले जुने हिशोब…

64
Deonar Dumping Ground वरून राजकारण तापले; गिधाडांचे आरोप आणि कचऱ्यातून बाहेर पडलेले जुने हिशोब...
  • प्रतिनिधी

मुंबईच्या देवनार डम्पिंग ग्राउंडवरील (Deonar Dumping Ground) कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी पुन्हा एकदा राजकीय रणकंदन माजवले आहे. महापालिकेने या डम्पिंग ग्राउंडच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी तब्बल २,३६८ कोटी रुपयांची निविदा काढल्यावर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांनी थेट आरोपांच्या तोफा डागल्या.

शेलार यांनी यावेळी आरोप केला की, देवनार डम्पिंगच्या (Deonar Dumping Ground) भोवती काही राजकीय गिधाडे, कावळे आणि बगळे पुन्हा एकदा घिरट्या घालू लागले आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत हेच लोक या कचऱ्यावरचं कटकमिशन खाऊन गलेलठ्ठ झाले असून, आता नव्या निविदेवर राजकारण करत आहेत, असा थेट हल्ला शेलार यांनी केला.

(हेही वाचा – Turkiye : पाकिस्तानशी मैत्री पडली महागात, भारताने केली Turkiye विरुद्ध मोठी कारवाई! वाचा संपूर्ण बातमी)

आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा

या सर्व आरोपांच्या केंद्रस्थानी ठरले शिवसेना उबाठा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे. शेलार म्हणाले, २००८ मध्ये आदित्य ठाकरे यांच्या पक्षाच्या महापालिकेत सत्ता असताना देवनार डम्पिंग ग्राउंडच्या (Deonar Dumping Ground) विल्हेवाटीसाठी ४,५०० कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही या निविदेतील त्रुटी आणि निधी वाया जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, आमच्या विरोधाला दुर्लक्ष करत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी कंत्राट मंजूर केले.

आजही देवनारमध्ये (Deonar Dumping Ground) कचऱ्याचे ढिगारे तसेच आहेत, मुंबईकरांना दमा, फुफ्फुसाचे आजार यांचा त्रास होत आहे. न्यायालयाने झापल्यावरच सत्ताधाऱ्यांना जाग आली, असेही त्यांनी टोला लगावत स्पष्ट केले.

(हेही वाचा – Naxalism :   छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर Naxalist वर कारवाई, पुढील वर्षापर्यंत देश नक्षलमुक्त…;केंद्रीय गृहमंत्र्यांचा निर्धार)

धारावी पुनर्विकासातही विरोधाचे राजकारण?

देवनार डम्पिंग ग्राउंडचा (Deonar Dumping Ground) पुनर्विकास आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प एकमेकांशी संबंधित असून, धारावीतील प्रकल्पासाठी देवनारची जागा वापरली जाणार आहे. यामध्ये एक इंच जागाही अदानीच्या नावावर जाणार नाही, असा दावा करत शेलार यांनी विचारले, “जे लोक ४,५०० कोटींची निविदा दिली त्यांनीच आता २,३६८ कोटींवर ओरडण्याचे कारण काय?”

या प्रकल्पामुळे धारावीतील झोपडपट्टीवासीयांना घरे, शाळा, बगीचे, मोकळी मैदाने मिळणार आहेत आणि सरकारला महसूलही मिळणार आहे. तरीही आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा विरोध का आहे? असा सवाल करत शेलार यांनी ठाकरेंना चिमटा काढला.

(हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा सहकारी Tariq Parveen ची जामिनावर सुटका)

कचऱ्यातून बाहेर पडलेला जुना राजकीय वास?

देवनारच्या (Deonar Dumping Ground) दुर्गंधीत फक्त कचऱ्याचा नाही तर गेल्या दोन दशकांच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा वास दरवळत आहे. भाजप आणि शिवसेनेतील नव्याने पेटलेले हे युद्ध मुंबईच्या नागरी सुविधांच्या मुद्द्यावर किती काळ रंगणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.