दिल्ली शहर आणि आजुबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस (Delhi Heavy rain) सुरु आहे. वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी पडझड झाली आहे. हवामान विभागाकडून दिल्लीसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळावरील 100 विमानांच्या उड्डाणावर परिणाम झाला आहे. तसेच दिल्लीतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. (Delhi Heavy rain)
#WATCH | Delhi: Traffic congestion and slow vehicular movement witnessed at Dhaula Kuan following heavy rainfall pic.twitter.com/i8MTJC1Bcf
— ANI (@ANI) May 25, 2025
शनिवारी संध्याकाळी उशिरा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानंतर काही तासांतच हवामानात मोठा बदल झालेला दिसून आला. शनिवार रात्री आणि रविवारी सकाळी दिल्लीत जोरदार वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक भागात पाणी साचले. अनेक झाडे उन्मळून पडली. मिंटो ब्रिजवर कार पाण्यात बुडाली. वाहतूक आणि विमानसेवा प्रभावित झाली आहे. (Delhi Heavy rain)
Windspeed warning has been increased to 78-110km/h category for all parts of Delhi and Ncr now.
Storm will hit within 85 minutes https://t.co/GYG06oxzIK
— IndiaMetSky Weather (@indiametsky) May 24, 2025
हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ६० ते ८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा दिला होता. याअंतर्गत दिल्ली-एनसीआरसाठी रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. नवी दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. मिंटो रोड, हुमायून रोड आणि शास्त्री भवनसारखे परिसर पाण्याखाली गेले होते. तसेच मिंटो ब्रिजवर पुन्हा पाणी साचले आहे. नेहमी मुसळधार पावसानंतर या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. (Delhi Heavy rain)
दिल्लीत झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम विमान सेवेवर झाला आहे. यासंदर्भात इंडिगोने ‘एक्स’ वर माहिती दिली की, दिल्लीतील खराब हवामानामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या विमानाची परिस्थिती तपासावी. शनिवारी रात्री उशिरा हवामान विभागाने पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला. त्यानंतर काही तासांतच जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. याशिवाय महाराष्ट्रातही हवामान बदलला असून अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. (Delhi Heavy rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community