Delhi Government : २७ वर्षात जे करता आले नाही, ते भाजपने १०० दिवसांत करून दाखविले. दिल्ली सरकार(Delhi Government)ने १०० दिवसांच्या कार्यपध्दतीनंतर कार्यपुस्तिका प्रसिध्द केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वातील सरकारने २० फेब्रुवारी २०२५ यादिवशी शपथ घेतल्यानंतर १०० दिवस पूर्ण केले आहेत. तब्बल २७ वर्षांनंतर भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ४८ जागा जिंकत पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले.(Delhi Government)
(हेही वाचा पश्चिम रेल्वेवर शनिवारपासून 36 तासांचा Mega Block; 162 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मोठा फटका )
१०० दिवसांच्या कार्यपध्दतीवर बोलताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, दिल्ली सरकार(Delhi Government) लोकांच्या हक्कांसाठी कठोर परिश्रम करत आहे, याचा जनतेला आनंद आहे. विकसित भारतासोबत दिल्लीही पुढे जाईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या घोषणेचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दिल्ली सरकार(Delhi Government)च्या कार्यपुस्तिकेत मागील १०० दिवसांत कोणकोणते विकासकाम हाती घेतले गेले. विशेषतः आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज आणि गरिबांच्या कल्याणाशी संबंधित योजनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्री आशिष सूद आणि कपिल मिश्रा यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘कार्यपुस्तिके’मध्ये सरकारच्या अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांचे तपशीलवार वर्णन देण्यात आले आहे.(Delhi Government)
#WATCH | Delhi: Delhi Minister Manjinder Singh Sirsa says, “What could not be done in 27 years, we have done it. The previous governments used to lie. We have done historic work in the field of health, education, industry, infrastructure in 100 days… Today, the people of Delhi… pic.twitter.com/vd30Yx0jqC
— ANI (@ANI) May 31, 2025
दिल्ली सरकारच्या लोककल्याणकारी योजना पुढीलप्रमाणे : –
महिला सन्मान योजना – दरमहा गरीब महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ५१,००० कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.
वय वंदना योजना – ७० वर्षांवरील वृद्धांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, मदत आणि सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
DEVI बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला – महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी DEVI (दिल्ली एक्सप्रेस व्हॅन फॉर इम्प्रूव्ह्ड सेफ्टी) बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
यमुना स्वच्छता – यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पथदिवे – दिल्लीच्या रस्त्यांवर अधिकाधिक चांगले पथदिवे बसविले जात आहेत. जेणेकरून, रात्रीच्या वेळी चांगली प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा असेल.
Join Our WhatsApp Community