Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांचा टोला; जे शरद पवार काँग्रेस काळात CBI ला पोपट म्हणायचे, तेच आता…

Deepak Kesarkar : विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे', असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या वक्तव्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी टोला लगावला आहे.

168
Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांचा टोला; जे शरद पवार काँग्रेस काळात CBI ला पोपट म्हणायचे, तेच आता...
Deepak Kesarkar : दीपक केसरकर यांचा टोला; जे शरद पवार काँग्रेस काळात CBI ला पोपट म्हणायचे, तेच आता...

काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा शरद पवार सीबीआयला पोपट म्हणायचे आणि आता तेच शरद पवार इडीवरून टीका करत आहेत. त्यांनी आधी उमेदवारी जाहीर करावी. मग आम्ही बघू काय करायचे, अशी टीका मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केली आहे.

(हेही वाचा – Amrita Fadnavis : सत्तेसाठी काहींना वडिलांच्याच शब्दांचा विसर; अमृता फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला)

संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि वाट लागली

शरद पवार यांनी त्यांच्या अलीकडच्या भाषणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) टीका केली आहे. ‘भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे’, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या वक्तव्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी टोला लगावला आहे.

दीपक केसरकर यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधला आहे. हल्ली अॅसिडिटी झाल्यासारखे बोलू लागले आहेत, त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. दिल्लीवरून आल्यावर उद्धव ठाकरे मोदींना भेटणार होते आणि भाजपसोबत जाणार होते. मात्र, संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि वाट लागली. याला जबाबदार संजय राऊतच आहेत, असे केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना अनेक जण भेटतात

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे गुंडांसोबत संबंध असल्याचे फोटोज व्हायरल करत आहेत. यावरून दीपक केसरकर यांनी त्यांचाही समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक जण भेटतात. त्यांच्यासोबत फोटो काढतात. अनेक जण कोण आहेत, हे माहीत नसते. प्रमुख म्हणून मुख्यमंत्री भेटतात. त्याचा अर्थ वेगळा काढणे योग्य नाही’, असे ते म्हणाले. (Deepak Kesarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.