Deepak Kesarkar : लोकसभा नाही विधानसभा लढणार

105
Deepak Kesarkar : लोकसभा नाही विधानसभा लढणार

आपण खासदारकीसाठी इच्छूक नाही. त्यामुळे आपला कोणीही कितीही वाईट प्रचार केला तरी आपण विधानसभेचीच निवडणूक लढवणार आहे. तसे आमचे युतीचे ठरले आहे, अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्ट केली. ते सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, जे कोणी आपला अपप्रचार करीत आहेत ते “इनोसंट” आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही टिका करणार नाही. जो कोणी लोकसभा लढवेल त्याला निवडून आणण्यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि ५० हजाराचे लीड मिळून देईन, असेही केसरकर म्हणाले.

(हेही वाचा – Mahada Lottery : घराचा ताबाही आता ऑनलाइन)

आपण आगामी काळात विधानसभा लढवणार आहोत. कोणी खोटा प्रचार करत असेल तर त्यांना एवढेच सांगतो मी खासदारकी (Deepak Kesarkar) नाही तर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. तूर्तास मी अशा प्रकारे कोणती इच्छा व्यक्त केलेली नाही. पुढच्या टर्मला खासदारकीबाबत विचार करता येईल, परंतु असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहेत.

जे माझ्यावर टीका करत आहेत ते इनोसंट आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात काय बोलणार? असा उलट प्रश्न करत येणाऱ्या काळात कोणी कुठल्या मतदारसंघ लढवावा. ते आमच्यात ठरलेले आहे. कोणी म्हटले म्हणून ते बदलणार नाही, असे केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले.

(हेही वाचा – India vs Netherlands : प्लेईंग 11 मध्ये प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळणार?)

नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिंदे गटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही असा आरोप विरोधकांकडून होत आहे, याबाबत केसरकर (Deepak Kesarkar) यांना विचारले असता ते म्हणाले, आपण या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावरच्या निवडणुकात लक्ष घालत नाही. त्यामुळे कोणी काय बोलतोय त्यापेक्षा ग्रामीण भागातील माझे कार्यकर्ते दुखावले जाणार नाहीत यासाठी माझे प्रयत्न असतात. विधानसभा मतदार संघापुरते बोलायचे झाल्यास काही ठीकाणी भाजप शिंदे गट तर काही ठीकाणी मैत्रीपूर्ण लढती घेण्यात आल्या त्यात यश मिळाले आहे. असे ते म्हणाले. (Deepak Kesarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.