Deepak Kesarkar : मंत्रीपदासाठी १ कोटीचा चेक उद्धव ठाकरेंकडे दिला; काय म्हणाले दीपक केसरकर

Deepak Kesarkar : 'मी माझी वडिलोपार्जित जमीन विकून १ कोटीचा चेक दिला', असा खुलासा देखील मंत्री केसरकर यांनी केला आहे.

335
Deepak Kesarkar : मंत्रीपदासाठी १ कोटीचा चेक उद्धव ठाकरेंकडे दिला; काय म्हणाले दीपक केसरकर
Deepak Kesarkar : मंत्रीपदासाठी १ कोटीचा चेक उद्धव ठाकरेंकडे दिला; काय म्हणाले दीपक केसरकर

मंत्रीपदासाठी मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक कोटी रुपयांचा चेक दिला होता. त्यांनी पैसे मागितले की, पक्षनिधीसाठी हे मला माहिती नाही. त्यांनी अजूनही पैसे मागितले होते; मात्र माझ्याजवळ तेवढे पैसे नव्हते; त्यामुळे मी देऊ शकलो नाही आणि त्यामुळे माझे मंत्रीपद हुकले होते, असे सनसनाटी आरोप मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहेत.

(हेही वाचा – Sai Bhandara : मुंबई-शिर्डी पायी पालखी यात्रेनिमित्त चांदिवली येथे साई भंडाऱ्याचे आयोजन)

‘मी माझी वडिलोपार्जित जमीन विकून हे पैसे दिले’, असा खुलासा देखील मंत्री केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

कोकण दौऱ्यावर गेलेले उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या वेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीतून (NCP) शिवसेनेत आलेले आणि नंतर शिंदे गटात गेलेले दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचा उल्लेख डबल गद्दार असा केला होता. दीपक केसरकर या टीकेला आता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणी चंद्रकांत खैरे यांनी तो निधी पक्षनिधीच असल्याचा खुलासा केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.