
-
प्रतिनिधी
“जर २०१९ साली त्यांचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले असते, तर आज नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती…” — अशा घणाघाती शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत प्रहार केला.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या “नरकातील स्वर्ग” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामुळे चर्चेत आलेल्या संजय राऊत यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी (DCM Eknath Shinde) पक्षप्रवेशाच्या मोठ्या कार्यक्रमात जोरदार टीका केली. “गद्दारी करून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली नसती, तर आज अशी पुस्तके लिहिण्याची वेळच आली नसती,” असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला.
(हेही वाचा – Delhi AAP ला धक्का: १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा; MCD मध्ये वेगळा गट स्थापन करण्याची केली घोषणा)
उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केले लक्ष्य
उपमुख्यमंत्री शिंदेंनी (DCM Eknath Shinde) अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. “बाळासाहेबांनी ओळखलेलं हिंदुत्वाचे नेतृत्व ओळखण्यात जे अयशस्वी ठरले, त्यांनीच आज राज्याची सत्ता मिळवण्यासाठी विचारांना गाडून टाकलं,” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वगुणांमुळेच बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता, हे आज काहींना समजत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पक्षप्रवेशाचा महापूर; शिवसेनेत नवचैतन्याचा शिडकावा
ठाण्यातील महापौर निवासस्थानी पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या जल्लोषात उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) भारावले होते. “शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाचा मान राखू” असे ठाम वचन त्यांनी दिले.
(हेही वाचा – KL Rahul to be Captain? भारतीय कर्णधारपदासाठी आता के. एल. राहुलही शर्यतीत)
कात्रज विकास आघाडीचा शिवसेनेत प्रवेश
पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर, आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या स्थानिक समस्या — वाहतूक कोंडी, पाणीटंचाई यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी (DCM Eknath Shinde) दिले. “ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचा हा विश्वास मी नक्की सार्थ ठरवीन,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेनेला ‘कुस्तीगिरांची ताकद’
या वेळी महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे व ग्रीक-रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला, ज्यामुळे “शिवसेनेला नव्याने बळ मिळाले” असे मत उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.
“स्वर्गाच्या शोधात जे नरकात गेले…” – सडेतोड टीकेचा दणका
कार्यक्रमाचा शेवट करताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी पुन्हा राऊत यांच्यावर बोचरी टीका करत म्हणाले, “जनतेच्या मनातली शिवसेना ही संकटात धावून जाणारी आहे, त्याउलट काही लोकांना सत्ता टिकवण्यासाठी नरकात जाऊन स्वर्ग शोधावा लागतोय…” यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना सचिव राम रेपाळे, रणजीत पायगुडे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community