
-
प्रतिनिधी
मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेची रणनिती आता प्रत्यक्ष अंमलात येऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी स्वतः मैदानात उतरून शिवसेनेच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शासकीय यंत्रणांना अडचणी दूर करण्याचे स्पष्ट आदेश देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.
(हेही वाचा – कायद्याचे उल्लंघन सहन करणार नाही; America ने का दिले स्पष्टीकरण ?)
कुर्ला आणि चांदीवलीवर विशेष लक्ष
कुर्ला विधानसभा मतदारसंघातील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या भागातील प्रलंबित कामांबाबत उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी थेट उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत स्थानिक प्रकल्प, विकासकामे, नागरी समस्या यावर चर्चा झाली असून तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.
त्याचप्रमाणे, चांदीवली मतदारसंघातील आमदार दिलीप लांडे यांच्या भागातील प्रलंबित कामांवरही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे या मतदारसंघातील कामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – World Test Championship : कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड?)
महापालिका निवडणुकीचा मोठा डाव
मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेने ठोस हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना उबाठाच्या तुलनेत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी विकासकामांचा झपाटा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेनेकडील मतदारसंघांमध्ये कामांची गती वाढल्याने, स्थानिक जनता खुश होण्याची शक्यता आहे, आणि त्याचा थेट फायदा आगामी निवडणुकीत मिळेल, असा भाजपा-शिवसेनेचा विश्वास आहे.
मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे शिवसेना आणि शिवसेना उबाठामध्ये प्रतिष्ठेची लढाई! त्यामुळेच शिवसेना काहीही करून सत्ता मिळवण्याच्या तयारीला लागलेला दिसतो. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी प्रशासनाला हाताशी धरत विकासकामांच्या माध्यमातून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याची मोहीम सुरू केली आहे. या रणनीतीमुळे शिवसेना उबाठासाठी आगामी लढत अधिक कठीण होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community