बारामतीत DCM Ajit Pawar यांची परत एकदा एकहाती सत्ता; छत्रपती साखर कारखान्यावर ‘जय भवानी’ चा झेंडा

140
बारामतीत DCM Ajit Pawar यांची परत एकदा एकहाती सत्ता; छत्रपती साखर कारखान्यावर 'जय भवानी' चा झेंडा
  • प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री जय भवानी माता’ पॅनलने छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवत पुन्हा एकदा बारामतीत आपली पकड सिद्ध केली आहे. या निवडणुकीतील सर्व २१ जागांवर विजय मिळवत अजित पवारांच्या गटाने एकहाती सत्ता मिळवली.

हा निकाल केवळ एका साखर कारखान्यापुरता मर्यादित न राहता, बारामतीच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांची अजूनही अढळ पकड असल्याचा स्पष्ट संदेश देणारा ठरतो आहे. विरोधकांनी काही जागांवर जोर लावण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो पुरेसा ठरला नाही.

(हेही वाचा – Operation Sindoor Delegation : केंद्राच्या शिष्टमंडळाला ठाकरे गटाचा जाहीर पाठिंबा; पक्षाचा संजय राऊतांना घरचा आहेर)

या निकालावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत म्हटलं, “ही विजयाची परंपरा बारामतीच्या जनतेच्या आशीर्वादामुळेच कायम आहे. आम्ही केवळ साखर कारखाना चालवत नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बळकट करत आहोत.”

या विजयामुळे आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाच्या रणनीतीला बळ मिळेल, असा राजकीय संकेत मिळत आहे. दरम्यान, विरोधक मात्र हा पराभव गिळून न गिळण्या अवस्थेत असून अंतर्मुख होण्याची वेळ त्यांच्या गटावर आल्याचे बोलले जात आहे. बारामतीत पुन्हा एकदा ‘दादा’ म्हणवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा (DCM Ajit Pawar) साखर राजकारणात ‘गोड’ विजय साजरा होत आहे!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.