Crime News : चार महिन्यात पत्नीकडून पतीची हत्या केल्याच्या ६ घटनांची नोंद , सर्व हत्या विवाहबाह्य सबंधातून

Crime News : चार महिन्यात पत्नीकडून पतीची हत्या केल्याच्या ६ घटनांची नोंद , सर्व हत्या विवाहबाह्य सबंधातून

112
Crime News : चार महिन्यात पत्नीकडून पतीची हत्या केल्याच्या ६ घटनांची नोंद , सर्व हत्या विवाहबाह्य सबंधातून
Crime News : चार महिन्यात पत्नीकडून पतीची हत्या केल्याच्या ६ घटनांची नोंद , सर्व हत्या विवाहबाह्य सबंधातून

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला तिच्या प्रियकरासह अटक (Crime News) करण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील अँटॉप हिल येथे सोमवारी उघडकीस आली आहे. मागील चार महिन्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत या प्रकारच्या सहा घटना घडल्या असून या सहाही घटनेत आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. (Crime News)

इस्माईल अली शेख (३७)असे अँटॉप हिल येथे घडलेल्या घटनेत ठार करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. इस्माईल हा पत्नी सुमय्या (२७) सोबत अँटॉप हिल येथील राजीव गांधी नगर येथे एका चाळीत राहण्यास होता. सुमय्या हिचे सकलाईन गोलम किब्रिया शेख (२८) सोबत प्रेमप्रकरण सुरू होते. सकलाईन हा मीरा दातार दर्गा रे रोड राहणारा आहे. सुमय्या आणि सकलाईन या दोघांनी प्रेमात अडसर ठरलेला इस्माईल ठार करण्याचा कट रचला होता. (Crime News)

रविवारी रात्री सुमय्या आणि सकलाईन यांनी मिळून इस्माईल याची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. या हत्येनंतर सकलाईन हा तेथून पळून गेला, आणि सुमय्या हिने पती इस्माईल याचा मृतदेह घरातून बाहेर आणून रस्त्यावर टाकला आणि पतीची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही हत्या पत्नी सुमय्या आणि तिचा प्रियकर सकलाईन याने केल्याचे समोर आले. अंटोप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सुमय्या आणि सकलाईन या दोघांना अटक केली. (Crime News)

दुसरी घटना – नवी मुंबई
नवीमुंबईतील रबाळे एमआयडीसी येथे १६ मे रोजी एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने तिच्या मद्यपी पतीला दारू पाजून ठार करून मृतदेह नाल्यात फेकून दिला होता. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली होती.कालिदास वाघमारे (३०) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव असून पूनम कालिदास वाघमारे (२८)आणि तिचा प्रियकर सुरेश हरिप्रसाद यादव (२४) असे अटक करण्यात आलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराचे नाव आहे.पोलिस अजूनही पीडितेच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. (Crime News)

तिसरी घटना मुंबईतील गोरेगाव –
२० मार्च रोजी घडली, गोरेगाव येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय चंद्रशेखर चौहान यांची २८ वर्षीय पत्नी रंजू चौहान हिने तिचा प्रियकर शाहरुख आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने हत्या केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजुने प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह चारही आरोपीना अटक केली होती. (Crime News)

चौथी घटना मालाड मालवणी –
११ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईतील मालवणी
मालाड येथे घडली. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळीत राजेश चौहान (३०) हा रोजंदारीवर काम करणारा कामगार होता आणि तो त्याची पत्नी पूजा (२८) आणि त्यांच्या दोन मुलांसह मालाड पश्चिम येथील मालवणी येथे राहत होता. त्याचा मित्र इम्रान मन्सुरी (२६) हा नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता, राजेश याने त्याला राहण्यासाठी त्याच्या घरात आसरा दिला होता, तीन महिन्यापासून राजेशच्या घरी राहणाऱ्या इम्रानचे राजेशची पत्नी पूजा सोबत सूत जुळले होते, राजेशला याची कुणकुण लागली होती. त्याने इम्रानला तेथून निघून जाण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे इम्रान आणि पूजाने प्रेमाचा वाटेत काटा असलेल्या राजेशला ठार करण्याचा कट रचून दोघांनी मिळून त्याची हत्या करून मृतदेह
खारफुटीत टाकून दिला होता. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून पूजा आणि इम्रानला अटक केली. (Crime News)

पाचवी घटना नवी मुंबईतील उलवे येथे घडली
२२ फेब्रुवारी २०२५ रोजी विवाहवाह्य संबधातून एका माजी पोलीसाला हाताशी धरुन एका पत्नीनं आपल्याच पती विरोधात भयंकर पाऊल उचलत प्रियकराच्या मदतीने सचिन मोरे या पतीची हत्या करून मृतदेह वाव्हळ गावातील खाडी पुलावरून फेकून दिला होता. उलवे पोलिसांनी पत्नीला तिच्या प्रियकरासह अटक केली होती. (Crime News)

सहावी घटना वसईतील वालिव येथे २७ जानेवारी रोजी घडली…
नायगाव रेल्वे स्थानकाजवळील खारफुटीत एका पुरूषाचा अर्धवट कुजलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो जेजे रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. बेपत्ता व्यक्तीच्या अहवालाची तपासणी केल्यानंतर, त्या पुरूषाची ओळख उस्मान अन्सारी अशी झाली,तो गोरेगाव पूर्वेचा रहिवासी आहे.अन्सारीची हत्या झाल्याचे कळताच पोलिसांनी त्यांची पत्नी मीना अन्सारी यांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. तिच्या सततच्या चौकशीतून असे दिसून आले की तिने तिच्या पतीला मारण्यासाठी तिच्या शेजाऱ्यांना ५०,००० रुपये दिले होते.”आम्हाला संशय आहे की मीना आणि बिलालचे प्रेमसंबंध होते त्यातून हे हत्याकांड घडवून आणले होते. (Crime News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.