
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्यावर परदेशी विद्यार्थ्यांवर बंदी घातली होती. मात्र कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिल्याने ट्रम्प (Donald Trump) यांचे मनसुबे उधळले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची प्रवेश पात्रता ट्रम्प प्रशासनाने रद्द केल्याने विद्यापीठात कायदेशीर प्रवेश घेतलेल्या ८०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांसह हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प सरकारच्या या निर्णयाविरोधात बोस्टनच्या न्यायालयात धाव घेतली होती. (Donald Trump)
अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने गुरुवारी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शैक्षणिक देवाण-घेवाण प्रवेश कार्यक्रम प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे भविष्यात हार्वर्ड विद्यापीठ परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नव्हते. या निर्णयामुळे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कायदेशीर दर्जा रद्द झाला होता. त्यामुळे येथे सध्या शिक्षण घेत असलेल्या भारतीय व इतर देशांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ सोडावे लागणार होते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत हार्वर्ड विद्यापीठाच्या विविध विभागांत ७८८ विद्यार्थी व संशोधन करत आहेत. प्रत्येक वर्षी या विद्यापीठात ५०० ते ८०० विद्यार्थी व संशोधक शिक्षण आहेत. (Donald Trump)
हेही वाचा- Muhammad Yunus राजीनामा देण्याच्या तयारीत; असुरक्षित वाटत असल्याचा घेत आहेत अनुभव
ट्रम्प प्रशासनाने मागितलेली माहिती राजकीय प्रकारची असून हा घटनाबाह्य मार्गाने सूड उगवण्याचा प्रकार असल्याचा दावा हार्वर्ड विद्यापीठाने केला आहे. या निर्णयाचा हजारो विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होणार होता. (Donald Trump)
‘या’ 6 कडक अटी पूर्ण कराव्या लागणार (Donald Trump)
1. गेल्या 5 वर्षांतील सर्व अवैध कृतींचे रेकॉर्डपरराज्यातील विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ कॅम्पसवर किंवा बाहेर केलेल्या बेकायदेशीर कृतींसंदर्भातील सर्व दस्तऐवज, ऑडिओ/व्हिडीओ क्लिप द्याव्यात.
2. हिंसक किंवा धोकादायक वर्तनाचे पुरावेआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या हिंसक कृत्यांचा संपूर्ण अहवाल, कॅम्पसवर किंवा बाहेर, विद्यापीठाच्या ताब्यातील सर्व स्वरूपातील नोंदीसह सादर करणे आवश्यक.
3. इतर विद्यार्थ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना दिलेल्या धमक्यांचे पुरावेगेल्या पाच वर्षांत परराज्यातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची धमकी दिल्याचे पुरावे सादर करावेत.
4. विद्यार्थ्यांचे हक्क बळकावण्यासंदर्भातील रेकॉर्डअन्य विद्यार्थ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांचे हक्क नाकारण्याच्या / बळकावण्याच्या घटनांचे सर्व पुरावे देणे आवश्यक.
5. शिस्तभंग संबंधित संपूर्ण माहितीगेल्या 5 वर्षांत परराज्यातील विद्यार्थ्यांविरुद्ध झालेल्या सर्व शिस्तभंग कारवायांचे दस्तऐवज.
6. प्रदर्शन-आंदोलनांची व्हिडीओ/ऑडिओ रेकॉर्डिंगहार्वर्ड कॅम्पसवर परराज्यीय विद्यार्थ्यांच्या सहभागातील कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांची ऑडिओ वा व्हिडिओ रेकॉर्डिंग.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community