नॅशनल हेराल्ड (National Herald) मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. ईडीच्या आरोपपत्रातील बाजू जाणून घेण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची (National Herald) सुनावणी ८ मे २०२५ रोजी होणार आहे.
गेल्या सुनावणीत म्हणजेच २५ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयाने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नोटीस बजावण्यास नकार दिला होता. न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला अधिक पुरावे आणण्याचे आणि कमतरता दूर करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी, नॅशनल हेराल्ड (National Herald) मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते आणि त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतर अनेकांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community