Corporation Elections : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवं राजकीय समीकरण उदयास येणार?

ताजमधील गुप्त भेट! फडणवीस-राज ठाकरे एकत्र... ‘भाऊ’ की ‘देवाभाऊ’?

401
Corporation Elections : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवं राजकीय समीकरण उदयास येणार?
  • प्रतिनिधी

राजकारणात जे दिसतं त्याहून अधिक पडद्यामागे घडतं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वांद्रेच्या पंचतारांकित ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये अचानक झालेली ‘गुप्त’ भेट सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे. या दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीनं ‘भाऊ की देवाभाऊ?’ हा जुना प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. (Corporation Elections)

गोपनियतेत रंगलेली भेट आणि नवे संकेत

गुरुवारी सकाळी, कोणत्याही अधिकृत कार्यक्रमाविना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे ताफे वांद्रेतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले. या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी ती याच हॉटेलच्या एका खासगी रूममध्ये पार पडल्याचं समजतं. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीपूर्वीही दोघे याच हॉटेलमध्ये भेटले होते. (Corporation Elections)

(हेही वाचा – WTC Final : कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना अनिर्णित राहिला; पावसात वाहून गेला तर?)

महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा डाव?

राज्याच्या विधानसभेतील परिस्थिती पाहता, शिवसेना उबाठाला मोठा फटका बसला आहे, तर मनसे अजूनही अस्तित्वासाठी झगडते आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे कुटुंबात ‘मनोमिलन’ घडून येत असल्याचे संकेत मिळत असतानाच, राज ठाकरे यांची भाजपाशी वाढती जवळीक उद्धव ठाकरे यांच्यासाठी नवा पेच निर्माण करू शकते. (Corporation Elections)

‘भाऊभाऊ’ की ‘राजकीय समजुतदार भाऊ’?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद सुरळीत होऊ लागलेला असतानाच, राज ठाकरे यांचा भाजपाशी नव्याने संवाद सुरू होणं म्हणजे या समीकरणात महत्त्वाचा ट्विस्ट ठरतोय. यामुळे “राज ठाकरे भाजपाच्या जवळ जातायत का?”, “उद्धव-राज युती फिसकटते का?”, हे प्रश्न आता थेट समोर येत आहेत. (Corporation Elections)

(हेही वाचा – Musk – Trump Feud : एलॉन मस्क – डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद संपला? मस्क यांचा माफीनामा; ट्रम्प यांची माफी)

गुप्तता अधिक संशयास्पद!

या भेटीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नसल्यामुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिकृत कार्यक्रम यादीत याचा उल्लेख नसल्याने ही भेट संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जर ही बैठक मंत्रालय, वर्षा किंवा सह्याद्रीमध्ये झाली असती, तर ती एक नियमित स्नेहभेट म्हणून पाहिली गेली असती. पण पंचतारांकित हॉटेलमधील गुप्त बैठक ही निश्चितच नवे संकेत देते. (Corporation Elections)

राजकीय ताशेरे

राजकारणात वैयक्तिक स्नेह असतोच. विरोधी पक्षाचे नेतेही वेळोवेळी भेटत असतात. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातही याआधी अनेकदा संवाद झाले आहेत. पण या वेळच्या भेटीचं वेगळेपण म्हणजे – ती अगदी निवडणूकपूर्व वळणावर, गुप्तपणे आणि जिथे ‘राजकीय चर्चा’ सहज नोंद होऊ शकत नाही, अशा ठिकाणी पार पडली. (Corporation Elections)

(हेही वाचा – Mumbai Drug Cartel: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ७ ब्रिटीश नागरिकांना अटक)

एक वाक्य, अनेक अर्थ – ‘भाऊ की देवाभाऊ?’

या भेटीनंतर सर्वसामान्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत एकच चर्चा रंगू लागली – 

  • “राज ठाकरे भाजपाच्या गळाला लागलेत का?”
  • “उद्धव ठाकरे पुन्हा एकाकी पडणार का?”
  • “महापालिका निवडणुकीत मनसेचा भाजपाशी हातमिळवणीचा डाव?”

राजकीय संधी, धोरणं आणि आकांक्षा यांच्या गाठीभेटीतून पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळणार, हे नक्की! (Corporation Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.