Mithi River मधील गाळाच्या विल्हेवाटीसाठी कंत्राटदारांनी शोधले नवीन डम्पिंग ग्राऊंड, महापे ऐवजी मुंब्य्रात लागणार विल्हेवाट

Mithi River मधील गाळाच्या विल्हेवाटीसाठी कंत्राटदारांनी शोधले नवीन डम्पिंग ग्राऊंड, महापे ऐवजी मुंब्य्रात लागणार विल्हेवाट

305
Mithi River सफाईच्या अबतक ५६ दिवसांत सॉफ्टवेअर आणि पावसाने घातला घोळ; मुदत वाढवून देण्याचा विचार

मुंबई ( विशेष प्रतिनिधी)

पावसामुळे आधीच नदीतील काढून ठेवलेला गाळ पाण्यात वाहून गेला, त्यातच डम्पिंग ग्राऊंडवर पाणी साचून दलदल निर्माण झाल्याने गाळ उचलण्यात होणारा विलंब लक्षात घेता अखेर मिठी नदीतील (Mithi River) काढलेल्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ हा महापे येथील डम्पिंग ग्राऊंड ऐवजी मुंब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणार असून गुरुवारी रात्रीपासूनच हा गाळ उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Mithi River)

हेही वाचा-IPL 2025, MI vs GT : रंगतदार सामन्यात गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव करत मुंबई इंडियन्सची आगेकूच

मुंबई महापालिकेच्यावतीने मिठी नदीच्या सफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राद देण्यात आले आहे. या तिन भागांमध्ये कंत्राटदारांची निवड केल्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मिठी नदीतील गाळ बाजुला काढून ठेवल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यानंतर हा गाळ महापालिकेच्या एआय सॉफ्टवेअरवर सर्व प्रकारची नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर डंपरद्वारे महापे येथील एका गावात निश्चित केलेल्या महापे येथील डम्पिंग ग्राऊंडवर खाली केला जात आहे. (Mithi River)

हेही वाचा- Exam : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; आरोग्य विद्यापीठाची ‘या’ तारखेला होणार पीएच. डी. सामाईक प्रवेश परीक्षा

मात्र, मागील आठवड्यापासून मुंबईसह राज्यात पावसाची संततधार सुरु असून महापे येथील या डम्पिंग ग्राऊंड परिसरात पाणी जमा होवून जाण्याच्या मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे गाळ वाहून नेणारे डंपर चालक आतमध्ये वाहन नेण्यास नकार देत असून काही वाहने आतमध्ये गेल्यानंतर अडकल्यानंतर तुर्तास तरी कोणत्याही प्रकारची गाळाची वाहतूक करण्यास डंपर चालक तयार नसल्याने मिठी नदीचा काढून ठेवलेला गाळही उचलला जात नाही. (Mithi River)

हेही वाचा- वाळू चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे निर्देश

परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४८ तासांमध्ये गाळ उचलला जावा अशाप्रकारचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात डम्पिंग ग्राऊंडवर पाणी तसेच चिखलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने गाळ उचलून वाहून नेण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली होती. परंतु, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अखेर मिठी नदीतील सर्व कंत्राटदारांनी अखेर नवीन डम्पिंग ग्राऊंडचा शोध घेतला आहे. त्यासाठी मुब्रा येथील डम्पिंग ग्राऊंडची जागा निश्चित केली आहे. याठिकाणी गुरुवापासून पुन्हा गाळ टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मिठी नदीतील गाळ उचलण्याच्या कामाला शिथिलता आली होती, ते काम पुन्हा सुरु झाल्याने मिठी नदीच्या सफाई कामाला पुन्हा गती प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. (Mithi River)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.