Congress अद्याप अशोक चव्हाण यांच्या धक्क्यात, Mahavikas Aghadi जागावाटप विसरले

गेल्या महिनाभरात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाठा तसेच महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही याबाबत संभ्रमात असलेला वंचित बहुजन आघाडी पक्ष आठवड्यातून किमान दोन बैठका घेऊन जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.

195
Congress अद्याप अशोक चव्हाण यांच्या धक्क्यात, Mahavikas Aghadi जागावाटप विसरले

गेल्या सोमवारी म्हणजेच १२ फेब्रुवारीला अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला जो धक्का बसला त्यातुन पक्ष अद्याप सावरला नसल्याचे चित्र दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी मॅरेथॉन बैठका घेत जागावाटपावर चर्चा करणाऱ्या महाविकास आघाडीची गेल्या आठवडाभरात एकही बैठक घेण्याची हिम्मत झाली नाही. (Congress)

आघाडी चव्हाणांमध्येच अडकलेली

गेल्या महिनाभरात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट (NCP Sharadchandra Pawar) आणि शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) तसेच महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही याबाबत संभ्रमात असलेला वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) पक्ष आठवड्यातून किमान दोन बैठका घेऊन जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. मात्र, चव्हाण यांनी पक्ष सोडला आणि दुसऱ्या दिवशी ‘कमळ’ हाती घेतलं. तिसऱ्या दिवशी त्यांच्या राज्यसभा उमेदवारीची घोषणा भाजपकडून करण्यात आली आणि चौथ्या दिवशी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. (Congress)

(हेही वाचा – Raj Thackeray : निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांनी रुजू होऊ नये; राज ठाकरे यांचे फर्मान)

समन्वयाचा अभाव

यामुळे मराठवाडा (Marathwada) काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का बसला असून अद्याप आघाडीत चव्हाण यांच्या जाण्याचीच चर्चा सुरु आहे. आधीच अंतर्गत मतभेद (internal conflict) असलेला काँग्रेस पक्ष, पक्ष आणि चिन्ह गमावल्याने बिथरलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, कायम संभ्रमावसथेत (Confused) असणारा वंचित बहुजन पक्ष आणि दिशाहीन (directionless) उबाठा गट यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (Congress)

सगळे घटक पक्ष आपल्याच विवंचनेत

जागावाटप अंतिम झाले नसताना उबाठा गटाने परस्पर २३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले तर वंचितने ३९ मुद्दे महाविकास आघाडीसमोर ठेऊन त्यावर एकमत होत नाही तोवर जागावाटपावर चर्चा होणार नाही अशी भूमिका घेतली. राष्ट्रवादी गटाला बारामती लोकसभा मतदार संघाची चिंता भेडसावू लागली आहे तर काँग्रेस नेते एकेमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. एकूणच कुठलाही ताळमेळ नसलेली आणि प्रत्येक घटक पक्ष आपल्याच विवंचनेत अडकलेल्यांची महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीला कशी सामोरी जाणार? असा प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.