आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना अपमानित करण्याची राहुल गांधींची (Rahul Gandhi) सवय त्यांच्याच अंगाशी आली आहे. पत्रकार परिषदेत अध्यादेश फाडणे, जाहीर सभेत ज्येष्ठ नेत्यांची तुलना घोडे, गाढव यांच्याशी करणे, अशा वृत्तीवर ज्येष्ठ काँग्रेस (Congress) नेत्याने राहुल गांधी यांना खडेबोल सुनावले आहेत. काँग्रेस नेते लक्ष्मण सिंग (Laxman Singh) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी राहुल गांधी यांना आरसाच दाखवला आहे.
(हेही वाचा – Chhattisgarh Liquor Scam Case : छत्तीसगडचे काँग्रेस भवन जप्त; ईडीची मोठी कारवाई)
तुम्ही स्वतः रेस हारलेले आहात
पूर्ण देशात आज काँग्रेसची काय स्थिती आहे. मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) एकही सीट जिंकता आली नाही. आणि तुम्ही स्वतःला रेसचा घोडा म्हणवून घेता. तुम्ही स्वतः रेस हारलेले आहात आणि इव्हीएमला दोष देता. तुमच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला वरातीतील घोडा म्हणता, कोणाला रेसचा घोडा म्हणता, कोणाला लंगडा घोडा म्हणता. तुमची तर वरातच निघालेली नाही. वरातीचा घोडा कसा चालतो, हे तुम्हाला कसे माहिती ? तुमची तर अजून वरातच निघालेली नाही, असे परखड बोल सिंग यांनी सुनावले आहेत.
राहुल गांधी भोपाळमध्ये (Bhopal) काँग्रेसच्या युवा नेत्यांना संबोधित करत होते. त्या वेळी त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली होती. राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेस असे व्यासपीठ आहे जिथे घोडेही आहेत, गाढवही आहेत आणि खेचरही आहेत आणि हेच लोकशाहीचे सौंदर्य आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. आता तर पक्षातील नेते स्वतःहून समोर येऊन नाराजी व्यक्त करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community