
-
खास प्रतिनिधी
पहलगाम (Pahalgam) अतिरेकी हल्ल्यानंतर कोणत्याही कारणाने मुस्लिम समजाची बाजू घेता येत नसल्याने काँग्रेस नेते बिथरले असून त्यांनीच अफवा पसरवण्याचे प्रयत्न आता सुरू केले आहे. काँग्रेस नेते रत्नाकर महाजन समाजमाध्यमावर एक पोस्ट करून पहलगाम हल्ल्यात मृत झालेले २६ पैकी १४ मुस्लिम होते, असे सांगून जनतेची दिशाभूल केली ज्याला लोकांनी सडेतोड उत्तर दिले.
अफवा कुणी पसरवली?
रत्नाकर महाजन यांनी ‘फेसबूक’ वर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले की, “पहलगाम (Pahalgam) मधील आतंकी हल्ल्यात मृत झालेल्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्या 26 पैकी 14 मुस्लिम आहेत. हल्लेखोरांनी त्या प्रत्येकाचा धर्म विचारला आणि मग त्यांना मारले ही मुळात अशक्य असलेली अफवा कुणी पसरवली याची कसून चौकशी झाली पाहिजे.”
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तान घाबरला ! कराची किनारपट्टीवर क्षेपणास्त्र चाचणी ; पाकच्या कुरापतींकडे भारताची बारीक नजर)
कुटुंबियांचा अपमान
खरे तर, ही अफवा नसून ज्या कुटुंबातील पुरुषांना अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले, त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना दिलेली ही माहिती आहे. तसेच त्या कुटुंबियांनी आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर तत्काळ व्यक्त केलेल्या या भावना आहेत, याला अफवा म्हणून रत्नाकर मतकरी यांनी खरं तर त्या कुटुंबियांचा अपमान केला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
मराठीत समजत नसावे म्हणून इंग्लिश
एका नेटकाऱ्याने रत्नाकर महाजन यांना थेट प्रश्न करीत विचारले, “कुठे आहे यादी ? जी प्रसिद्ध झालीय त्यात तर एकच मुस्लिम आहे?” तर दुसऱ्याने “यांच्या यादीत तर दोन मुस्लिम नावे आहेत,” असे सांगून महाजन यांना जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला. एकाने तर “असल्या जाणून बुजून पासरवलेल्या अफवांचा शोध कोण घेणार?” असा प्रश्न उपस्थित केला. एकाने तर मराठीत समजत नसावे म्हणून इंग्लिश भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला, “There is one Muslim,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या पोस्टवर दिली.
(हेही वाचा – Gold Rate Fluctuation : सोन्याच्या दरांत उतार चढाव का? वाचा दरांतील विविध टप्पे)
बहुदा फेक यादी
तर एकाने रत्नाकर महाजन यांनाच “ती बहुदा फेक यादी असावी,” असे त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. तसेच “मुस्लिम, ख्रिश्चन आहेत. २ परदेशीही आहेत पण १४ मुस्लिम नाहीत,” असे सुनावले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community